तेलंगणामध्ये ई-मोटर शो सुरु आहे. त्यामध्ये तेलंगणा सरकारने या शो मध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच जगातील सर्वात वेगवान कारचे लॉन्चिंग केले आहे. ई-मोबिलिटी विकचा एक भाग म्हणून या सर्वात वेगवान कारचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. कारण आज (११ फेब्रुवारी ) होणाऱ्या भारतातील पहिल्या फॉर्म्युला ई ग्रँड प्रिक्ससाठी हैदराबाद शहर सज्ज झाले आहे.

इटालियन लक्झरी कार उत्पादक कंपनी Automobili Pininfarina ने हैदराबाद येथील ई-मोटर शो मध्ये आपल्या नवीन ऑल-इलेक्ट्रिक कार GT Batista लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक कार भारतातील पहिल्याच फॉर्म्युला ई ग्रँड प्रिक्समध्ये सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम आज होणार आहे. GT Batista ही कार इटलीची लक्झरी कार उत्पादक Automobili Pininfarina या कंपनीने विकसित आणि डिझाईन केली आहे. यावर संपूर्ण मालकी ही महिंद्रा कंपनीची आहे. ही कार केवळ इटलीतील नव्हे तर जगातील सर्वात वेगवान कार आहे.

These countries have the most rivers in the world
जगातील ‘या’ देशांमध्ये आहेत सर्वाधिक नद्या; जाणून घ्या भारतातील नद्यांची संख्या
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
tall people cancer risk
उंच लोकांना होऊ शकतो तब्बल आठ प्रकारचा कॅन्सर, इतरांच्या तुलनेत धोकाही सर्वाधिक; कारण काय?
Goldman Sachs gold prediction
Goldman Sachs about Gold: सोन्यात गुंतवणूक करावी का? ‘गोल्डमन सॅक्स’ म्हणतं ‘Go for it’, कारण…
Tumblr move all blogs to WordPress
इंटरनेटच्या जगातील आजवरचे सर्वात मोठे स्थलांतर! Tumblr अ‍ॅप करणार युजर्सचे ब्लॉग… वाचा नक्की काय होणार बदल
Weather Update IMD News
Weather Update : भारतात गेल्या १२३ वर्षांत ऑगस्टमध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद; ‘आयएमडी’ने काय म्हटलं?
Nitin Gadkari statement about Indian citizens on free stuff Nagpur news
फुकटेगिरीत भारतीय सर्वाधिक..! नितीन गडकरींचे बिनधास्त बोल
tallest skydeck in india
भारतातील ‘या’ राज्यात तयार होणार कुतुबमिनारपेक्षाही तीन पट उंच स्कायडेक; काय असेल या प्रकल्पाचे वैशिष्ट्य?

हेही वाचा : Odysse E-Scooter: ओडिसीची नवीन ई-स्कूटर वाहणार २५० किलोचे वजन, एकदा चार्ज झाली की धावणार ‘इतके’ अंतर, जाणून घ्या

काय म्हणाले तेलंगणा सरकार

तेलंगणा सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स आणि प्रगत रसायनशास्त्र सेलचे संचालक सुजय करमपुरी म्हणाले की, तेलंगणा राज्य नेहमी विकास आणि नवकल्पनांसाठी केंद्रस्थानावर टिकून राहिला आहे. इलेक्ट्रिक वाहन हे शाश्वत गतिशीलतेचे भविष्य आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. हरित भविष्यासाठी आम्ही राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. तेलंगणाचे महिंद्रा ग्रुपसोबत चांगले संबंध आहेत. इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केल्याबद्दल महिंद्रा कंपनीचा अभिमान वाटतो.

महिंद्रा अँड महिंद्राच्या युरोप बिझनेसचे सीईओ गुरप्रताप बोपाराय म्हणाले, GT Batista कार खरोखरच इलेक्ट्रिक वाहनांमधील टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधित्व करते. ही कार हैदराबाद ई-प्रिक्स सर्किटमध्ये सहभागी होणार आहे.

Automobili Pininfarina चे सीईओ पाओलो डेलाचा म्हणाले की, आम्ही हैद्राबादमध्ये होणाऱ्या ई -मोटर शो चा भाग झाल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही भविष्यात महिंद्रा ग्रुपसोबत एक मजबूत संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही आणखी अधिक रोमांचक अशी नवीन माहिती लवकर जाहीर करणार आहोत.

हेही वाचा : मारुती सुझुकीने लॉन्च केली Black Edition Arena, ‘या’ गाड्यांचा असणार समावेश, जाणून घ्या

हैद्राबाद ई -मोटर शो ८ ते १० फेब्रुवारी २०२३ रोजी Hitex एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये व्यावसायिक ईव्ही उत्पादक, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि ईव्ही घटक उत्पादक कंपन्या त्यांची उत्पादने लॉन्च केली.

जाणून घ्या किंमत आणि स्पीड

GT Batista कारची किंमत १८ कोटी रुपये आहे. ही कार १.८६ सेकंदात ०-१०० किती प्रतितास आणि ४.७५ सेकंदात ०-२०० किमी प्रतितास इतका स्पीड पकडते. या कारच्या स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास याचा टॉप स्पीड हा ३५० किमी प्रतितास इतका आहे. तसेच यामध्ये १२० kWh क्षमतेची बॅटरी पॅक आहे. T Batista च्या रेंजबाबा बोलायचे झाल्यास त्याची रेंज ही ४८२ किमी इतकी आहे जी EPA रेटेड आहे.