देशातील आघाडीची दुचाकी कंपनी बजाज बाजारात वेगवेगळ्या किमतीच्या बाईक विकते. बाजारात बजाजच्या बाईकची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कंपनी नवनवीन बाईक देशातील बाजारपेठेत सादर करत असते. तसेच काही जुन्या बाईकना कंपनी अपडेट्स देत असते. आता पुन्हा एकदा कंपनीने भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय बाईक नव्या अवतारात दाखल केली आहे.
बजाज ऑटोने अपडेटेड Pulsar N160 मोटरसायकल लाँच केली आहे. N160 लेटेस्ट एडिशन बाईक पल्सर लाइनअपमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. नवीन Pulsar N160 मधील सर्वात मोठे अपडेट हे त्याचे फ्रंट USD फोर्क्स आहे, ज्यामुळे बाईकच्या सस्पेंशन कार्यक्षमतेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. Pulsar N160 चे नवीन मॉडेल त्याच्या जुन्या प्रकारापेक्षा सहा हजार रुपयांनी महाग आहे. बाजारात ही एकमेव १६०cc बाईक आहे जी ड्युअल चॅनल ABS सह येते.
2024 Pulsar N160 मध्ये एक ब्लूटूथ-सक्षम इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील आहे जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनच्या सुविधेसह येतो. याशिवाय, बाईकला आता रोड, रेन आणि ऑफ-रोड असे तीन ABS मोड मिळतात. तथापि, या बाईकमध्ये एबीएस मोड पूर्णपणे बंद करता येत नाही, तर एबीएस केवळ मोड्सनुसार समायोजित केले जाऊ शकते.
(हे ही वाचा: किंमत ३.९९ लाख, मायलेज २६.६८ किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त छोट्या कार, विक्रीतही टाॅपवर, पाहा यादी)
बाईक ड्युअल चॅनल एबीएसने सुसज्ज
नवीन Pulsar N160 चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात लाल, पांढरा, निळा आणि काळा समावेश आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, जुन्या मॉडेलचे तेच १६४.८२cc सिंगल सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन यात वापरले गेले आहे, जे १६ एचपी पॉवर आणि १४.७ एनएम पीक टॉर्क देते. ब्रेकिंगसाठी, बाईकला स्टँडर्ड ड्युअल चॅनल एबीएससह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत १.४० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
इतर पल्सर मॉडेल्सनाही अपडेट
नवीन N160 प्रकारांव्यतिरिक्त, बजाज ऑटोने Pulsar 125, Pulsar 150 आणि Pulsar 220F च्या २०२४ मॉडेल्ससाठी अपडेट देखील जाहीर केली आहेत. या मॉडेल्समध्ये आता ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जर आणि नवीन ग्राफिक्ससह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. या अद्ययावत मॉडेल्सच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत: Pulsar 125 ची किंमत ९२,८८३ रुपये, Pulsar 150 ची किंमत १.१४ लाख रुपये आणि Pulsar 220F ची किंमत १.४१ लाख रुपये आहे. सर्व किमती एक्स-शोरूम आहेत.