Bajaj’s upcoming CNG-powered Bike:  देशात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अनेक लोकं आता पेट्रोल आणि डिझेलच्या कार वगळून सीएनजी कार्सचा पर्याय निवडत आहेत. पण आता भारतीय बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीनंतर सीएनजी बाईक येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्राप्त माहितीनुसार, देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या दुचाकी वाहन निर्मिती कंपन्यांपैकी एक बजाज ऑटो (Bajaj Bike) ही कंपनी बाजारपेठेत सीएनजी बाईक आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. बजाज ऑटो भारतीय बाजारपेठेसाठी CNG बाईकचा पर्याय शोधत आहे. लोकांसाठी वाहन चालवण्याचा खर्च कमी करणे आणि प्रदूषण कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंतर्गत कोडनेम ब्रुझर E101 आहे. ही बाईक अंतिम टप्प्यात आहे.

कधी होईल लाँच?

अहवालानुसार, बजाजची पहिली सीएनजी बाईक एका वर्षांत बाजारात येऊ शकते. काही प्रोटोटाइप युनिट्स आधीच बनवल्या गेल्या आहेत. ही ११० सीसीची बाईक असू शकते. सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीमध्ये या बाईकची निर्मिती होणार असल्याची माहिती आहे आणि नंतर पंतनगर येथील कंपनीमध्येही या बाईकचे उत्पादन होणार अशी योजना आहे.

CNG बाईकचे नाव काय असेल?

यासाठी प्लॅटिना ब्रँडच्या नावाचा विचार केला जात आहे. मात्र, बजाज ऑटोचे ईडी राकेश शर्मा यांनी याबाबत अद्यापही खुलासा केलेला नाही. तर येत्या काळात १००-११० सीसी सेगमेंटमध्ये बजाजच्या सीएनजी बाईक सादर केले जाणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. या बाईकमुळे सर्वसामान्यांना इंधनाचा खर्च वाचू शकतो.