Bajaj Auto to Launch New CNG Bike: तुम्ही आतापर्यंत पेट्रोलवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक बाईकबद्दलच ऐकले. पण अलीकडेच देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी बजाजने जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करुन सर्वांनाच थक्क करुन टाकले आहे. आता पुन्हा एकदा कंपनी देशातील बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. बजाज ऑटो एक नवीन CNG बाईक, इथेनॉल वाहन आणि नवीन चेतक EV लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकरच दुसरी सीएनजी बाईक सादर करणार असल्याचे बजाज ऑटोचे सीईओ राजीव बजाज यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, CNG बाईक व्यतिरिक्त, बजाज ऑटो पुढील महिन्यात इथेनॉलवर चालणाऱ्या बाईक आणि थ्री-व्हीलरचे प्रदर्शन करण्याचा विचार करत आहे. यासाठी, कंपनीने FY25 ला लाँच करण्याचे शेड्यूल केले आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला नवीन चेतक प्लॅटफॉर्मसह FY25 मध्ये स्वस्त आणि प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च करण्याची कंपनीची योजना असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांना सीएनजी बाईकचा आनंद घेता येणार आहे.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत

(हे ही वाचा : Honda Activa ची उडाली झोप, TVS Jupiter स्कूटर नव्या अवतारात परवडणाऱ्या किमतीत देशात दाखल, किंमत फक्त…)

बजाजच्या जगातील पहिल्या सीएनजी बाईकचे अलीकडेच लाँचिंग करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सीईओ राजीव बजाज उपस्थित होते. त्यावेळी बजाज फ्रिडम सीएनजी बाईकची किंमत, मायलेज आणि फिचर्सही प्रसिद्ध करण्यात आली. जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 मध्ये कंपनीने १२५ सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन बाईकला ९.५PS ची पॉवर आणि ९.७Nm चा टॉर्क जनरेट करते. बजाज फ्रिडममध्ये दोन लीटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे. सीएनजी संपल्यानंतर रिझर्व्ह म्हणून हे पेट्रोल वापरता येणार आहे. सामान्य बाईकमध्ये १० ते १२ लीटरची पेट्रोलची टाकी असते. कंपनीच्या दाव्यानुसार, बाईक फुल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) ३३० किमीपर्यंतचे अंतर कापते.

ही बाईक तीन प्रकारांमध्ये आणि सात ड्युअल-टोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. फ्रीडम 125 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: डिस्क एलईडी, ड्रम एलईडी आणि ड्रम. नवीन फ्रीडम १२५ सीएनजी बाइकमध्ये सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या बाईकने ११ सुरक्षा चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. लॉन्चच्या वेळी, बजाजने एक व्हिडिओ देखील जारी केला होता, ज्यामध्ये १० टन ट्रक बाइकवरून गेला तरी त्याचे काहीही होणार नाही, असे दाखवण्यात आले होते. या टाकीला डाव्या आणि उजव्या बाजूला अतिशय मजबूत फ्रेम आहे. बाईकची किंमत ९५ हजार रुपयांपासून सुरू होते.

Story img Loader