Bajaj Chetak Electric Scooter Launch: बजाज चेतक स्कूटर अनेक भारतीयाचं पहिलं प्रेम आहे. एकेकाळी बजाज चेतक स्कुटरने बाजारात धुमाकूळ घातला होता. अशातच आता ५२ वर्षानंतर Bajaj Chetak नव्या अवतारात लाँच झाली आहे. बजाज ऑटोने इंडियन मार्केटमध्ये नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ३५ सीरिज लाँच केली आहे. इलेक्ट्रीक व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेले बजाज चेतक स्कूटरचे हे आजपर्यंतचे सर्वात बेस्ट मॉडेल आहे. जाणून घेऊया या नव्या बजाज चेतकमध्ये फिचर्स काय असतील? याची किंमत किती असेल?
चेतक 3502 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १.२० लाख रुपये तर चेतक 3501 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १.२७ लाख रुपये आहे. कंपनी लवकरच 3503 व्हेरिएंट देखील लाँच करणार आहे. २०२०मध्ये लाँच झालेली ही स्कूटर आता अनेक अपडेट्ससह आज लाँच करण्यात आली आहे. १९७२ मध्ये पहिली चेतक स्कूटर पुण्यातील आकुर्डी येथील बजाज ऑटोच्या उत्सा प्लांटमध्ये लाँच करण्यात आली. यानंतर जवळपास ५२ वर्षांनंतर कंपनीने त्याच प्लांटमधून चेतक इलेक्ट्रिकचे सर्वात बेस्ट मॉडेल लाँच केले आहे.
लुक आणि डिझाईन
या स्कूटीच्या लुक आणि डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर नवीन बजाज चेतक 35 हे मॉडेल आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहे. निओ-क्लासिक लुक आणि मेटॅलिक बॉडी या स्कूटरला जास्त खास बनवते. यात एलईडी डीआरएलसह गोल हेडलॅम्प सेटअप आहे. स्लीक ऍप्रन, इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटर आणि चेतक बॅज याला मॉडर्न लुक देतात. नवीन चेतकमध्ये आधीच्या तुलनेत 35 लिटरची मोठी बूट स्पेस आहे.
हेही वाचा >> बाकी कंपन्यांची उडाली झोप! पॅनोरॅमिक सनरूफ, ६ एअरबॅग्स अन्…, Kiaची नवीकोरी एसयूव्ही भारतात झाली लाँच
चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ३५ सीरिज स्कूटरमध्ये कंपनीने नवीन चेतकमध्ये ३.५kWh क्षमतेचा नवीन बॅटरी पॅक दिला आहे. सिंगल चार्ज रेंजसह १५३ Km इतकी रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. यात कंपनीने ९५० वॅट ऑनबोर्ड चार्जरची सुविधाही दिली आहे. फक्त ३ तासात बॅटरी ८०% पर्यंत चार्ज होते असा दावा देखील कंपनीने केला आहे. घरगुती पॉवर सॉकेटच्या मदतीने देखील बॅटरी सहजपणे चार्ज करू शकता येवू शकते.