इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारडून फेम-२ ही सबसिडी दिली जाते. परंतु, अलिकडेच या सबसिडीत सरकारने कपात केली आहे. परिणामी इलेक्ट्रिक वाहनं महागली आहेत. असं असलं तरी इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करायचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. बजाज ऑटोने त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतकच्या किंमतीत २२ हजार रुपयांची कपात केली आहे. आता या स्कूटरची सुरुवातीची किंमत १.३० लाख रुपये इतकी आहे. यापूर्वी बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १.५२ लाख रुपये इतकी होती.

दरम्यान, बजाज कंपनीने या स्कूटरचं बेस व्हेरिएंट बंद केलं आहे. या स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची किंमत १.२२ लाख रुपये इतकी होती. म्हणजेच आता ग्राहक या स्कूटरचे केवळ प्रीमियम एडिशनच खरेदी करू शकतात.

financial intelligence unit imposes rs 54 lakh fine on union bank of india for pmla violations
युनियन बँकेवर वित्तीय गुप्तचर यंत्रणेकडून ५४ लाखांचा दंड; मुंबईतील शाखेतील संशयास्पद व्यवहारांच्या देखरेखीत अपयशाचा ठपका
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
BYD offers discounts on Electric Vehicles
BYD Seal offers : ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तीन वर्षांची सर्व्हिस, मेन्टेनन्स पॅकेज फ्री! वाचा सिंगल चार्जिंगमध्ये किती देते रेंज
CCTV, Thane district, Thane, Thane latest news,
उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही
Shortage of petrol diesel in Pune Pimpri Chinchwad due to protest of pump owner Pune news
पुणे, पिंपरी-चिंचवडवर इंधन टंचाईचे सावट! पंपचालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल, डिझेलचा तुटवडा
Ajna card stealing gang , mobile tower, Vasai,
वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर
AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल

कंपनीने बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. जी 3.8kW इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. या पॉवरफुल बॅटरी आणि मोटरच्या जोरावर ही इलेक्ट्रिक स्कूटर ५.५ पीएस पॉवर जनरेट करू शकते. ही स्कूटर इको मोडवर ९५ किमी आणि स्पोर्ट मोडवर ८५ किमीपर्यंतची रेंज देते. या स्कूटरसह दिल्या जाणाऱ्या 5Amp आउटलेटद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर १०० टक्के चार्जिंगसाठी ५ तास लागतात.

हे ही वाचा >> Hero Lectro ला ही विसरुन जाल, टाटाची स्वस्त इलेक्ट्रिक सायकल देशात आलीये; २.५० रुपयात धावणार ३५ किमी

चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये १२ इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही ट्युबलेस टायर्स आहेत. तसेच या स्कूटरच्या फ्रंट-व्हीलला लीडिंग-लिंक प्रकारचं सस्पेन्शन दिलं आहे. तर बॅक व्हीलला (मागच्या चाकाला) मोनोशॉक सस्पेन्शन दिलं आहे. या स्कूटरला रिव्हर्स गियरही देण्यात आला आहे.