Bajaj Pulsar N125 :बजाज ऑटोने १६ ऑक्टोबर रोजी पल्सर N125 लॉन्च केल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. बजाज पल्सर N125 ही नवीन मोटारसायकल 125X विभागातील TVS रायडर 125, हिरो एक्सस्ट्रिम 125R, होंडा एसपी 125 या मोटारसायलबरोबर स्पर्धा करणार आहे. N125 ही Pulsar 125 आणि NS125 नंतर पल्सरची तिसरी 125cc मोटरसायकल असणार आहे.

बजाज पल्सर N125: काय आहे खास? (Bajaj Pulsar N125: What is it)

बजाज पल्सर N125 ही एक प्रीमियम कम्युटर मोटरसायकल आहे जी शहरी राइडिंगसाठी डिझाइन केलेली आहे. यात एलईडी हेडलाइट, मस्क्यूलर फ्युएल टँक आणि ट्विन एलईडी टेल लाइट्ससह आकर्षक डिझाइन आहे. बाइकमध्ये रुंद हँडलबार, स्प्लिट सीट आणि पिलियनसाठी पारंपारिक ग्रॅब रेल आहे. स्टायलिश लूक आणि व्यावहारिक वैशिष्ट्यांसह, Pulsar N125 एक रोमांचक पण आरामदायी राइड देण्याचे वचन देते, ज्यामुळे ती दैनंदिन प्रवासासाठी एक आदर्श पर्याय ठरते.

हेही वाचा –एलॉन मस्कने टेस्लाच्या रोबोटॅक्सीचे केले अनावरण, स्टीअरिंगशिवाय धावणार सायबरकॅब

बजाज पल्सर N125: इंजिन आणि हॉर्डवेअर (Bajaj Pulsar N125: Engine and Hardware)

N125 मध्ये ११.८ bhp १२५ cc एअर कूल्ड इंजिन १०.८ Nm टॉर्कसह चालण्याची अपेक्षा आहे. हे ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. अहवालानुसार, बजाज पल्सर N125 च्या इंजिनची कार्यक्षमता सुधारून किंवा वाढवू शकते, ज्यामुळे ते अधिक शक्तिशाली, कार्यक्षम किंवा प्रतिसादात्मक होईल.

हार्डवेअरच्या बाबतीत, N125 ला मागील मोनो शॉकसह पारंपारिक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स मिळतील. यात फ्रंट डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रमचे कॉम्बिनेशन मिळेल. टॉप मॉडेलमध्ये रिअर डिस्क ब्रेक आहेत.

हेही वाचा –Festive Season : TVS iQube वर ₹३०,००० पर्यंत मिळेल कॅशबॅक, जाणून घ्या काय आहेत फिचर्स

बजाज पल्सर N125: अपेक्षित किंमत (Bajaj Pulsar N125: Expected Price)

सध्याच्या Pulsar 125 आणि NS125 ची किंमत ९२,८८३ आणि Rs १.०१ लाख आहे, N125 ची किंमत सुमारे १ लाख रुपये अपेक्षित आहे. नवीन N125 १६ ऑक्टोबर रोजी पदार्पण केली आणि TVS Raider 125, Hero Xtreme 125R आणि Honda SP 125सह स्पर्धा करेल.