Bajaj Motors: भारतीय बाजारपेठेत उच्च मायलेज असलेल्या बाईकची मागणी सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत बजाज मोटर्सने नुकतीच बाजारात (Bajaj Motors) आपली नवीन बाईक ‘Bajaj CT 110X’ बाजारात आणली आहे. कंपनीची ही आकर्षक दिसणारी बाईक आहे. लोकांना त्याचे मजबूत इंजिन आणि जास्त मायलेज आवडते. कंपनीने ही सर्वोत्तम बाईक किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट या दोन व्हेरियंटसह बाजारात आणली आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईकवरील फायनान्स प्लॅनवरील माहिती देणार आहोत.
Bajaj CT 110X Electric Start किंमत
बजाज CT 110X इलेक्ट्रिक स्टार्ट हा बाईकचा टॉप-एंड प्रकार आहे, ज्याची किंमत ६७,३२२ रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली) जी ऑन-रोड ८२,६७० रुपयांपर्यंत जाते. या बाईकच्या ऑन रोड किमतीनुसार ही बाईक घेण्यासाठी ८२ हजार रुपये लागतील. जर तुमचे बजेट ८२ हजार रुपये नसेल, तर तुम्ही येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे २० हजार रुपये भरून बजाज CT 110X इलेक्ट्रिक स्टार्ट बाईक देखील मिळवू शकता.
(हे ही वाचा: मारुतीची ६ लाखाची ३३.८५ किमीचा जबरदस्त मायलेज देणारी ‘ही’ कार ३२ हजारात आणा घरी)
Bajaj CT 110X Electric Start फायनान्स योजना
जर तुम्हाला ही मायलेज देणारी बाईक घ्यायची असेल आणि तुमचे बजेट २० हजार रुपये असेल, तर डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार बँक या बाईकसाठी ६२,६७० रुपये कर्ज देऊ शकते. या कर्जावर बँक वार्षिक ९.७ टक्के व्याज आकारेल.
Bajaj CT 110X Electric Start डाउन पेमेंट आणि EMI
Bajaj CT 110X इलेक्ट्रिक स्टार्टवर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला या बाईकच्या डाउन पेमेंटसाठी २०,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी दरमहा रु २,०१३ चा मासिक EMI जमा करावा लागेल.