Bajaj Freedom 125 bookings open: बजाज ऑटोची नवीन सीएनजी बाईक ‘फ्रीडम 125’ येताच बाजारात खळबळ उडाली आहे. या बाईकबद्दल ग्राहक खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. संपूर्ण देशाला या बजाज बाईकचे वेड लागले आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनीने या बाईकसाठी देशभरात बुकिंगही सुरू केले आहे. नवीन फ्रीडम 125 सीएनजी बाईकच्या आगमनाने स्पर्धा वाढली आहे. बाइकची किंमत ९५ हजार रुपयांपासून सुरू होते. तुम्हीही जगातील पहिली CNG बाईक घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या बाईकची वैशिष्ट्ये.

देशभरात बुकिंग सुरू

बजाज ऑटोने देशभरात नवीन फ्रीडम 125 साठी बुकिंग सुरू केले आहे. फ्रीडम 125 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि पहिली मोटरसायकल पुण्यातील ग्राहकाला दिली गेली. नवीन फ्रीडममध्ये १२५cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे ९.५ PS पॉवर आणि ९.७ Nm टॉर्क जनरेट करते. यात ५ स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. १२५cc मध्ये हे एकमेव इंजिन आहे जे CNG+ पेट्रोलवर काम करते. इंजिनला अशा प्रकारे ट्यून केले गेले आहे की ते सर्व प्रकारच्या हवामानात चांगली कामगिरी करू शकते.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Best bus accident Kurla, BJP demands inquiry Best bus,
बेस्ट बस अपघात : राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बस गाड्यांवरून आदित्य ठाकरे लक्ष्य
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
uber shikara
‘Uber’ने आता बोटसुद्धा बुक करता येणार; उबरने सुरू केलेली नवीन सेवा काय आहे?

बजाज फ्रीडम 125 मध्ये फक्त २ किलोचा CNG सिलेंडर आहे आणि तो पूर्ण टाकीवर २०० किलोमीटर चालेल. फक्त २ लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक १३० किलोमीटरपर्यंत धावेल. एकूणच ही बाईक ३३० किलोमीटर (CNG + पेट्रोल) पर्यंत धावेल. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या बाइकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल स्पीडोमीटर, सीएनजी आणि हँडलबारवरील पेट्रोल शिफ्ट बटण, यूएसबी पोर्ट, सर्वात लांब सीट आणि गियर शिफ्ट इंडिकेटर यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

( हे ही वाचा : किंमत ३.९९ लाख, एक लिटर पेट्रोलवर धावते २५ किमी, लहान कुटुंबासाठी एकदम परफेक्ट ठरते ‘ही’ मारुती कार )

नवीन फ्रीडम १२५ सीएनजी बाइकमध्ये सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या बाईकने ११ सुरक्षा चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. लॉन्चच्या वेळी, बजाजने एक व्हिडिओ देखील जारी केला होता, ज्यामध्ये १० टन ट्रक बाइकवरून गेला तरी त्याचे काहीही होणार नाही, असे दाखवण्यात आले होते. या टाकीला डाव्या आणि उजव्या बाजूला अतिशय मजबूत फ्रेम आहे.

टक्कर होऊनही सीएनजी टँकची स्थिती बदलणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. एवढेच नाही तर सीएनजी गॅस गळती होणार नाही, याचा अर्थ ते रायडरसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. उत्तम ब्रेकिंगसाठी, बाईकच्या पुढील टायरमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेकची सुविधा आहे.

अलीकडेच, Rushlane ने Bajaj च्या नवीन Freedom 125 बाईकची मायलेज चाचणी केली, ज्यामध्ये तिला एक किलो CNG मध्ये ८५km मायलेज मिळाले, तर कंपनीचा दावा 100km/kg आहे. बजाज फ्रीडम १२५ मध्ये २ किलोची सीएनजी टाकी आणि २ लिटरची इंधन टाकी आहे. वास्तविक मायलेजमध्ये ही बाईक थोडी निराश करते. मायलेजबाबत इतर वापरकर्ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे बाकी आहे?

Story img Loader