Bajaj Freedom 125 CNG Waiting Period: बजाजने Freedom 125 CNG लाँच करून जगभरात खळबळ उडवून दिली आहे. ही जगातील पहिली CNG बाईक आहे. आता ते विकत घेण्याची शर्यत लागली आहे. पेट्रोल आणि सीएनजीवर धावणाऱ्या या बाईकबद्दल ग्राहकांमध्ये एक वेगळी क्रेज दिसून येतेय. देशातील बाजारात या बाईकला ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळतेय. फ्रीडम 125 ची किंमत ९५ हजार रुपयांपासून सुरू होते आणि ही बाईक फक्त १ हजार रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केली जाऊ शकते परंतु या बाईकच्या जास्त मागणीमुळे, तुम्हाला डिलिव्हरीसाठी आता बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बजाज फ्रीडम 125 CNG बाईकचा प्रतीक्षा कालावधी किती?

बजाजच्या सीएनजी बाईकचा सध्या, मुंबई, पुणे आणि गुजरातमधील निवडक भागांसारख्या प्रमुख शहरांमध्ये बोलबाला पाहायला मिळतोय. कंपनीने देशभरात आपली बुकिंग सुरू केली असून यासोबतच या बाईकचा प्रतीक्षा कालावधीही वाढला आहे. ही बाईक सादर होऊन फक्त काही दिवस झालेत. मुंबईत या बाईकसाठी जवळपास ३० दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. तर पुण्यात बाईकचा प्रतीक्षा कालावधी ३० ते ४५ दिवसांवर पोहोचला असून गुजरातमध्ये ४५ दिवस ते तीन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी पोहोचला आहे.

(हे ही वाचा : किंमत ३.९९ लाख, एक लिटर पेट्रोलवर धावते २५ किमी, लहान कुटुंबासाठी एकदम परफेक्ट ठरते ‘ही’ मारुती कार )

बजाज फ्रीडम 125 CNG बाईकमध्ये काय आहे खास?

फ्रीडम 125 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि पहिली मोटरसायकल पुण्यातील ग्राहकाला दिली गेली. नवीन फ्रीडममध्ये १२५cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे ९.५ PS पॉवर आणि ९.७ Nm टॉर्क जनरेट करते. यात ५ स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. १२५cc मध्ये हे एकमेव इंजिन आहे जे CNG+ पेट्रोलवर काम करते. इंजिनला अशा प्रकारे ट्यून केले गेले आहे की ते सर्व प्रकारच्या हवामानात चांगली कामगिरी करू शकते.

बजाज फ्रीडम 125 मध्ये फक्त २ किलोचा CNG सिलेंडर आहे आणि तो पूर्ण टाकीवर २०० किलोमीटर चालेल. फक्त २ लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक १३० किलोमीटरपर्यंत धावेल. एकूणच ही बाईक ३३० किलोमीटर (CNG + पेट्रोल) पर्यंत धावेल. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या बाइकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल स्पीडोमीटर, सीएनजी आणि हँडलबारवरील पेट्रोल शिफ्ट बटण, यूएसबी पोर्ट, सर्वात लांब सीट आणि गियर शिफ्ट इंडिकेटर यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

उत्तम ब्रेकिंगसाठी, बाईकच्या पुढील टायरमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेकची सुविधा आहे. कंपनीचा दावा आहे की, बजाजची फ्रीडम 125 बाईक सीएनजीवर १०० किमी मायलेज देते. बजाज फ्रीडम १२५ मध्ये २ किलोची सीएनजी टाकी आणि २ लिटरची इंधन टाकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj freedom 125 cng bike waiting period is up to three months pdb