Pulsar 125 carbon fiber edition : दमदार बॉडी, जबरदस्त मायलेज आणि स्पोर्टी लूकमुळे बजाजची पल्सर ग्राहकांना भुरळ घालते. ही बाईक अनेक व्हेरिएंटमध्ये मिळते. पल्सरच्या ताफ्यात १२५ ते २५० सीसी पर्यंतचे इंजिन असलेल्या बाईक्स आहेत. बजाजच्या एन्ट्रीलेव्हल सेगमेंटमध्ये अजून एका पल्सर बाइकचा समावेश झाला आहे. कंपनीने नवीन pulsar 125 carbon fiber edition भारतात लाँच केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्बन फायबर पल्सर १२५ सिंगल सीट व्हर्जनची किंमत ८९ हजार २५४ पासून सुरू होते, तर स्प्लिट सीट व्हर्जनची किंमत ९१ हजार ६४२ (एक्स शोरूम) रुपयांपासून सुरू होते. ही बाईक निळ्या आणि लाल अशा दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. हेडलम्प काऊल, इंधनाची टाकी, पुढचे फेन्डर, टेल सेक्शन, बेली पॅन आणि अलोय व्हिल्स हे भाग या बाईकला दमदार लूक देतात.

फीचर

बाईकमध्ये कुठलेही कॉस्मेटिक बदल झालेले नाही. बाईकला पूर्वीप्रमाणे १२४.४ सीसी फ्युअल इंजेक्टेड सिंगल सिलेंडर इंजिनपासून शक्ती मिळते. इंजिन ११.६४ बीएचपीची उर्जा आणि १०.८ एनएमचा टॉर्क निर्माण करतो. इंजिन ५ स्पीड गेअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. सस्पेन्शनसाठी बाईकमध्ये पुढे टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मागे ड्युअल शॉक अब्झॉर्बर्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढे २४० एमएमचा डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

नवीन बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर ही बाईक पल्सर १२५ निऑन एडिशनबरोबर विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल. दोन्ही बाईक्समध्ये बोल्टेड श्राउड्स, स्प्लिट ग्रॅब रिब्स, ब्लॅक्ट आऊट साईट स्लंग एक्झॉस्ट, दमदार फ्युअल टँक आणि सिंगल पॉड हेडलॅम्प देण्यात आले आहे. बाईकमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळत आहे. ही बाईक होंडा एसपी १२५ आणि हिरो ग्लॅमर १२५ ला आव्हान देईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj launched pulsar 125 carbon fiber edition ssb