Best Mileage Bike In India: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनाला मागणी आहे. कारण देशातील बहुतांश लोक छोट्या आणि दैनंदिन जीवनातील कामांसाठी दुचाकी वापरण्यास प्राधान्य देतात. या सेगमेंटमध्ये भारतात मायलेज बाईक खूप पसंत केल्या जातात. हेच कारण आहे की, देशात मायलेज बाईकला मोठी मागणी असून याची विक्रीही वाढत आहे.  आम्ही तुम्हाला अशा बाईकबद्दल सांगणार आहोत जी कमी किमतीत उत्तम मायलेज देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटारसायकल सेगमेंटमध्ये कमी किंमतीच्या जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सची मोठी रेंज उपलब्ध आहे. यात एक प्रमुख नाव म्हणजे बजाज प्लॅटिना. ती मायलेज आणि किंमत या दोन्हीसाठी ग्राहकांच्या पसंतीला उतरते. ही बाईक बजाज प्लॅटिना १०० (Bajaj Platina 100) आहे, जी उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जाते. ही सर्वात जास्त इंधन कार्यक्षम १००cc बाइक्सपैकी एक आहे. हे ७५-९० kmpl चा मायलेज देते. अशा स्थितीत पाहिल्यास १ किलोमीटरपर्यंत चालवण्याचा इंधन खर्च सुमारे १ रुपये ते १.३३ रुपये असू शकतो.

(हे ही वाचा: २० वर्षापासून बाजारात महिंद्राच्या ‘या’ स्वस्त सात सीटर कारचा तोरा; सर्व पडतात फेल, धडाक्यात होतेय विक्री )

Bajaj Platina 100 चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

या बाईकमध्ये ग्राहकांना आरामदायी सीट,  नायट्रोक्स स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग सस्पेंशन आणि ट्यूबलेस टायर मिळणार. याच्या मदतीने तुमचा लांब पल्ल्याचा प्रवास सुलभ आणि सहज होण्यास मदत होईल.ही बाईक कॉम्बो कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये  ब्लॅक आणि रेड, ब्लॅक आणि सिल्व्हर, ब्लॅक आणि गोल्ड आणि ब्लॅक आणि ब्लू यांचा समावेश आहे. भारतीय बाजारात या बाईकची स्पर्धा TVS Star City Plus, Honda Dream Neo आणि Hero MotoCorp HF Deluxe शी आहे.

बजाज प्लॅटिनामध्ये कंपनीने सिंगल सिलिंडरचे १०२ सीसीचे इंजिन दिले आहे. जे ७.९ पीएसचे पाॅवर आणि ८.३ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. या इंजिनबरोबर ४ स्पीड गिअरबाॅक्स दिले आहे. बाईकचे ब्रेकिंग सिस्टिमविषयी बोलाल तर तिचे फ्रंट व्हिलमध्ये डिस्क आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेक दिले आहे. त्याबरोबरच ट्युबलेस टायर दिले गेले आहे. मायलेज बाबत बजाजचा दावा आहे की बाईक ९० ते १०० किलोमीटरपर्यंत इतके लांब मायलेज देते.

Bajaj Platina 100 किंमत

बाईकमध्ये ११ लीटरची इंधन टाकी आहे. त्याची किंमत ६७,८०८ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. तर, त्याच्या ११० सीसी ड्रम ब्रेक प्रकाराची किंमत ७०,४०० रुपये आहे. हे चांगले मायलेज देखील देते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj platina 100 is a best mileage bike available at a starting price of rs 65948 in india pdb
Show comments