टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये चांगला मायलेजचा दावा करणाऱ्या अनेक बाइक्स आहेत. या बाइक्स कमी किमतीतही येतात. हीरो, बजाज, होंडा आणि TVS सारख्या कंपन्यांच्या चांगला मायलेज देणाऱ्या बाइक्स आहेत. तुम्हीही चांगली मायलेज देणारी बाइक घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला दोन लोकप्रिय बाइकचे संपूर्ण तपशील येथे दिले आहेत. योग्य बाइक निवड करण्यास मदत होईल. या तुलनेसाठी आमच्याकडे Bajaj Platina 100 आणि Hero HF Deluxe या बाइक्स आहेत. तुम्हाला या दोन्हीची किंमत ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.
Bajaj Platina 100: बजाज प्लॅटिना ही त्यांच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी मायलेज बाइक आहे, जी कंपनीने फक्त एकाच प्रकारात लाँच केली आहे. या बाइकला सिंगल सिलेंडर १०२ सीसी इंजिन दिले असून एअर-कूल्ड तंत्रज्ञान डीटीएसआय इंजिनवर आधारित आहे. हे इंजिन ७.९ पीएसची पॉवर आणि ८.३ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते, जे ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक लावले आहेत. तसेच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ८० किलोमीटर प्रति लीटर एवढा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. बजाज प्लॅटिनाची सुरुवातीची किंमत ५९,०४० रुपये आहे.
Hero HF Deluxe: हिरो एचएफ डिलक्स ही कमी वजनाची मायलेज देणारी बाईक आहे ज्याचे चार प्रकार कंपनीने बाजारात लॉन्च केले आहेत. या बाइकमध्ये ९७.०२सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक्सचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. तसेच ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ८३ किलोमीटर प्रति लीटर एवढा मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केला आहे. हिरो एचएफ डिलक्सची सुरुवातीची किंमत ५४,४८० रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर ६३,७७० रुपयांपर्यंत जाते.