देशातील टू व्हीलर सेक्टरमध्ये १०० सीसी बाइक्सना त्यांच्या मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते. तर १२५ सीसी बाइक्सना मायलेजसह स्टाइलसाठी प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही १२५ सीसी बाईक घेण्याचा विचार करत असाल मात्र गोंधळात असाल, तर तुम्ही या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय आणि स्टायलिश बाइक्सचे संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता. या दोन्ही बाइक्सचा मायलेज चांगला आहे. या तुलनेसाठी, आमच्याकडे बजाज पल्सर १२५ निऑन आणि हिरो ग्लॅमर आहेत. या दोन्ही बाइक्सच्या किंमतीपासून त्यांच्या वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशील जाणून घ्या.
बजाज पल्सर १२५ निऑन: बजाज पल्सर ही एक लोकप्रिय बाइक आहे ही बाइक वेगवान गतीसाठी पसंत केली जाते आणि कंपनीने ती चार प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या बाइकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात १२४.४ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ११.८ पीएस पॉवर आणि १०.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर या पल्सरच्या पुढच्या चाकात डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात ड्रम ब्रेक बसवण्यात आला आहे. मायलेजबाबत, बजाजचा दावा आहे की ही पल्सर १२५ निऑन ५७ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. बजाज पल्सर १२५ निऑनची सुरुवातीची किंमत ७८,९८९ रुपये असून टॉप मॉडेलमध्ये ८५,३३१ रुपयांपर्यंत जाते.
हिरो ग्लॅमर: हिरो ग्लॅमर ही त्यांच्या कंपनीची एक स्टायलिश आणि लोकप्रिय बाईक आहे. ही बाइक अलीकडेच Xtec अवतारसह बाजारात आणली गेली आहे. कंपनीने १२ प्रकारांसह लॉन्च केली आहे. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास यात १२४.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. इंजिन फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १०.८४ पीएस पॉवर आणि १०.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते, जे ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. मायलेजबद्दल, हिरोचा दावा आहे की ही बाईक ६९.४९ किमीचा मायलेज देते. तसेच मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. हिरो ग्लॅमरची सुरुवातीची किंमत ७५,९०० रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर जाताना ८५,९२० रुपयांपर्यंत जाते.