सध्या २०० सीसी सेगमेंटमध्ये बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाचेला भरपूर पसंती मिळत आहे. तुम्हाला जर दोन्ही बाइकपैकी कुठली बाइक घ्यावी याबाबत सूचत नसेल तर ही माहिती तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये न्यू जनरेशन Bajaj pulsar 250 आणि Apache RTR 200 4v या दोन बाइकची फीचर, इंजिन पावर, किंमत आणि इतर बाबतीत तुलना करण्यात आली आहे. यातून तुम्हाला कोणती बाइक घ्यावी हे ठरवणे सोपे जाऊ शकते.
बजाजने गेल्या वर्षी नव्या पिढीच्या पल्सर बाइक्स लाँच केल्या होत्या. एन २५० आणि एफ २५० या पल्सरच्या नव्या बाइक्स आहेत. तर २०० सीसी सेगमेंटमध्ये पल्सर नंतर अपाचे आरटीआर २०० ४ व्ही लोकप्रिय आहे. या दोन्ही बाइक्सबद्दल तुलनात्मक माहिती जाणून घेऊया.
(मुलांसोबत करा सुरक्षित प्रवास, स्कोडाच्या ‘या’ आलिशान कार्सवर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या ऑफर)
डिजाइन
पल्सर २५० ला नव्याने डिजाइन करण्यात आले आहे. मात्र मूळ पल्सरचे काही घटक अजूनही या बाइकमध्ये आहेत. जसे मस्क्युलर फ्यूअल टँक, वुल्फ आयपासून प्रेरित हेडलॅम्प स्ट्रपसह देण्यात आले आहेत. एकूणच नवी पल्सर २५० ही स्पोर्टी आणि आधुनिक दिसते. दुसरीकडे अपाचेच्या डिजाइनमध्ये काही विशेष बदल नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या अपडेट्समुळे अपाचे आधुनिक दिसते आणि पल्सरला टक्कर देते.
इंजिन आणि पावर
पल्सर २५० मध्ये नवीन २४९ सीसी टू व्हॉल्व, ऑइल कुल इंजिन देण्यात आले आहे. इंजिनला ५ स्पिड गेअर बॉक्सशी जोडण्यात आलेले आहे. इंजिन २४.५ पीएसची शक्ती निर्माण करते आणि २१.५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. मजबूत मिड रेंज आणि टॉर्कसाठी इंजिनला ट्यून करण्यात आले आहे. याने वाहतुकीत बाइक चालकाला वारंवार गेअर बदलण्याची गरज पडत नाही. दुसरीकडे अपाचे आरटीआरमध्ये १९७.७५ सीसीचे फोर व्हॉल्व ऑइल कुल इंजिन देण्यात आले आहे. स्पोर्ट्स मोडमध्ये ही बाइक २०.८२ पीएसची सर्वोच्च शक्ती आणि अर्बन आणि रेन मोडवर १७.२५ एनएमचा पिक टॉर्क देते. बाइकचे आउटपूट १७.३२ पीएस आणि १६.५१ एनएम पर्यंत मर्यादित आहे. इंजिन ५ स्पिड गेअरबॉक्सशी जोडून आहे.
(ही कार आल्टोपेक्षाही छोटी, फूल चार्जमध्ये २४० किमीची मिळते रेंज, जाणून घ्या किंमत आणि फीचर)
फीचर आणि किंमत
फीचरच्या बाबतीत अपाचे पल्सरपेक्षा पुढे आहे. बाइकमध्ये ग्लाइड थ्रू टेक्नोलॉजी, एडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लिव्हर, ब्ल्युटूथ कनेक्टिव्हिटी, रायडिंग मोड आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते. दुसरीकडे बजाज पल्सरमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक यूएसबी चार्जर मिळते. पल्सर एनालॉग टैकोमीटरसह उपलब्ध झाली आहे.
किंमतीबाबत बोलायचे झाले तर, अपाचेच्या सिंगल चॅनल एबीएस व्हेरिएंटची किंमत १.३९ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे, तर ड्युअल चॅनल एबीएस व्हेरिएंटची किंमत १.४४ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. तर पल्सर २५० सिंगल चॅनल एबीएस व्हेरिएंटची किंमत १.४५ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे तर ड्युअल चॅनल एबीएस व्हेरिएंटची किंमत १.५० लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.