Bajaj Chetak Electric Launch Date: बजाजची इलेक्ट्रिक चेतक आता नव्या अपडेट्ससह भारतीय बाजारपेठेत लाँच होण्यासाठी सज्ज आहे. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर २०२४ म्हणजे वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होणार आहे. बजाजने आपल्या नवीन मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ही स्कूटर एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. स्कूटरला चांगली रेंज देण्यासह त्याच्या पॉवरमध्ये अनेक मोठे बदले केले आहेत.
बजाज चेतक इलेक्ट्रिक कधी लाँच होईल?
बजाज चेतक इलेक्ट्रिक २० डिसेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या स्कूटची स्टाईल आणि लूक बजाज चेतकच्या पेट्रोल व्हेरियंटशी मिळताजुळता असू शकतो. ईव्हीच्या डिझाइनमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी त्यात काही बदलही पाहिले जाऊ शकतात. चेतकचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डिझाइन आणि लोकांची पसंती जपली जाईल याची विशेष काळजी वाहन निर्माते घेणार आहेत.
बजाज चेतकची रेंज आणि पॉवर
बजाज चेतक इलेक्ट्रिकमध्ये स्टोरेज स्पेस वाढवता येऊ शकते, ज्यामुळे बॅटरीची स्थितीदेखील बदलली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर त्यात अनेक पर्याय पाहायला मिळतात. तसेच, ही EV प्रीमियम फीचर्ससह येऊ शकते. बजाज त्याच्या रेट्रो डिझाइनची पॉवर वाढवू शकते. जास्त स्टोरेज स्पेस आणि चांगली पॉवर यामुळे या स्कूटरची किंमतही थोडी वाढू शकते.
Free Aadhaar update: उरले फक्त ४ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
चेतक ईव्ही या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी करणार स्पर्धा
बजाज चेतक इलेक्ट्रिकच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल सांगायचे तर, ही स्कूटर TVS iQube, Ola S1 Plus आणि Ather Rizzta यांना टक्कर देऊ शकते. सध्या बाजारात चेतकला मोठी मागणी आहे. ही स्कूटर या सेगमेंटमध्येही धमाका करू शकते. या स्कूटरची रेंज आणि किमतीबाबत माहिती येणे बाकी आहे.