प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, Bajaj-Triumph बाईक अखेर भारतात लाँच होणार आहे.  Bajaj Auto आणि  Bajaj Auto आणि Triumph Motorcycles मध्ये पार्टनरशिप झाली आहे. या दोन्ही कंपन्या आता प्रीमिअम मिड डिसप्लेसमेंट मोटरसायकलचे प्रोडक्शन करणार आहे. भारतासोबत या दोन्ही गाड्यांना विदेशांमध्येही विक्री केले जाणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन मॉडेल ३५०-४००cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित असल्याचे सांगितले जाते. याशिवाय बाईकच्या डिझाईनवरही खूप लक्ष दिले जाईल. असेही सांगितले जात आहे की, यात USD फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस एक मोनोशॉक मिळेल, तर बाईकला डिस्क ब्रेक आणि चांगल्या ब्रेकिंगसाठी ड्युअल-चॅनल ABS मिळण्याची अपेक्षा आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, बाईकमध्ये राइड-बाय-वायर, राइडिंग मोड, स्लिपर क्लच आणि अॅडजस्टेबल लीव्हर्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.

अहवालानुसार, Bajaj-Triumph भागीदारी भारतासाठी २००cc ते ७००cc बाईक्स बनवण्याची योजना आखत आहे. हा मध्यम आकाराचा विभाग आहे आणि बजाजला KTM साठी या जागेत बाईक बनवण्याचा खूप अनुभव आहे. पण विशेष म्हणजे या बाईक्सच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर Triumphच्या नवीन एंट्री रेंजसाठी भारत एक एक्सपोर्ट हब बनणार आहे.

(हे ही वाचा : ४.२ लाखाच्या कारसमोर सर्व पडल्या फिक्या, देशातच नव्हे तर परदेशातही उडवली खळबळ, होतेय धडाधड विक्री)

नवीन डीलरशिप उघडतील

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाज ऑटोने एप्रिलमध्ये Triumphच्या सर्व भारतीय डीलरशिप विकत घेतल्या होत्या. हे सध्या १५ आउटलेट व्यवस्थापित करेल आणि पुढील २ वर्षांत १२० हून अधिक शहरांमध्ये Triumph डीलरशिप सुरू करण्याची योजना आखत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, नवीन डीलरशिप बजाज आणि केटीएम डीलर नेटवर्कपासून स्वतंत्र असेल. नवीन ट्रायम्फ रोडस्टर Royal Enfield, Yezdi, Jawa आणि Honda यांच्या अनेक उत्पादनांना टक्कर देईल

हिरोचे मेड इन इंडिया नवीन हार्ले डेव्हिडसन ४ जुलै रोजी होणार सादर

बऱ्याच दिवसांपासून देशात बातम्या येत होत्या की, Hero MotoCorp लवकरच मेड इन इंडिया Harley-Davidson आणणार आहे. आणि आता कंपनीने Harley-Davidson बाईक सादर केली आहे जी Harley Davidson X440 या नावाने आली आहे. हे नवीन आणि पहिले मॉडेल Hero MotoCorp आणि Harley Davidson यांच्या भागीदारी अंतर्गत सादर करण्यात आले आहे.

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बाईकला ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर ४४०cc इंजिन देण्यात आले आहे. त्याला ४V हेड मिळणे अपेक्षित आहे आणि सुमारे ३०bhp आणि सुमारे ४० Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. बाईकच्या पुढील बाजूस १७-इंच टायर आणि मागील बाजूस १८-इंच टायर आहेत. त्याला २१० मिमीच्या ग्राउंड क्लीयरन्ससह स्ट्रीट रॉड देण्यात आला आहे. यात USD फ्रंट फोर्क्स, दोन्ही टोकाला सिंगल डिस्क सेटअपसह ड्युअल-चॅनल ABS आणि बायब्रे इन्स्ट्रुमेंट, मागील बाजूस ट्विन शॉक शोषक, न्यूट्रल फूटपेग्स मिळतात.

कधी होणार सादर आणि किंमत

या बाईक ५ जुलैला सादर होणार असल्याची माहिती आहे. या बाईकची किंमत २ लाख रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj triumph speed 400 and scrambler 400 x made its world premiere in london while they will be launched in india on july 5 2023 pdb
Show comments