Triumph India likely to launch more affordable Speed 400 on 17 September: दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची तरुणांमध्ये एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. परंतु, आता रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी ब्रिटीश बाईक निर्माता ट्रायम्फ आपली नवीन बाईक लाँच करत आहे. या नवीन बाईकमध्ये 400 cc पर्यंत हेवी पॉवर इंजिन दिले जाईल असा अंदाज आहे. सध्या ही बाईक बाजारात आधीपासून असलेल्या स्पीड 400 चे नवीन अपडेटेड व्हर्जन असेल की नवीन बाईक असेल याची माहिती कंपनीने शेअर केलेली नाही.

पण, ही बाईक लाँच होण्यापूर्वीच अनेक बाईकप्रेमी आता त्याच्या लूक आणि इंजिनची तुलना रॉयल एनफिल्डशी करत आहेत. दोन्ही बाईकच्या फीचर्स आणि मायलेजबद्दल जाणून घेऊ…

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

३ लिटरची इंधन टाकी आणि हायस्पीड

बाजारात सध्या असलेल्या Triumph Speed ​​400 बद्दल बोलायचे झाल्यास या पॉवरफुल बाईकमध्ये १३ लिटरची मोठी इंधन टाकी असेल, हायस्पीडसाठी बाईकमध्ये ६-स्पीड गिअरबॉक्स आहेत. या स्टायलिश बाईकची ऑन रोड किंमत २.६४ लाख रुपये असेल. या न्यू जनरेशन बाईकच्या सीटची हाइट ७९० मिमी आहे, ज्यामुळे खराब रस्त्यावरही ही बाईक चालवणे सोपे होईल. बाईकमध्ये ३९८.१५ CC चे जबरदस्त इंजिन पॉवर आहे. ट्रायम्फच्या या नव्या बाईकमध्ये ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदेखील देण्यात आले आहे.

Triumph Speed ​​400 हायलाइट्स पॉइंट्स
१) इंजिन क्षमता ३९८.१५ सीसी
२) मायलेज २९.८ kmpl
३) ट्रान्समिशन६ स्पीड मॅन्युअल
४) कर्ब व्हेट१७६ किलो
५) फ्यूल टँक कॅपिसिटी १३ लिटर
६) सीट हाइट – ७९० मिमी

Triumph Speed 400 चे फीचर्स

ट्रायम्फ स्पीड ४०० चे वजन १७६ किलो आहे. बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प आहेत आणि रायडरच्या सुरक्षेसाठी डिस्क ब्रेक्स आहेत. या बाईकमध्ये अतिरिक्त सुरक्षेसाठी कंपनीने अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. बाईकचे शक्तिशाली इंजिन ३९.५ bhp पॉवर आणि ३७.५ Nm टॉर्क जनरेट करते. बाईक सहजपणे २९.८ kmpl पर्यंत मायलेज देते. ही बाईक ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

हेही वाचा – आता २० किमीपर्यंत चालवा टेन्शन फ्री गाडी,भरावा लागणार नाही एक रुपयाही टोल; पण सरकारने ठेवली ‘ही’ अट

ट्रायम्फच्या या नव्या बाईकची रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 शी स्पर्धा पाहायला मिळेल. रॉयल एनफिल्डच्या या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकबद्दल बोलायचे तर या बाईकची सुरुवातीची किंमत २.५३ लाख रुपये आहे. ही बाईक 32 kmpl चा मायलेज देते. सुरक्षिततेसाठी या बाईकमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि डिस्क ब्रेक्स आहेत. याच्या सीटची उंची ८०५ मिमी आहे, त्यामुळे ही बाईक डोंगरावर चालवताना कोणतीही अडचण येत नाही. या बाईकचे एकूण वजन १९५ किलो आहे, ज्यामुळे ती रस्त्यावर स्मूथ स्पीडने चालते.

Royal Enfield Classic 350 मध्ये, लाँग रूटसाठी १३ लिटरचे मोठे फ्यूल टँक आहे. क्लासिक 350 मध्ये शक्तिशाली ३४९ सीसीचे सॉलिड इंजिन आहे. ही बाईक ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. यामध्ये ६ व्हेरियंट आणि अलॉय व्हील देण्यात येत आहेत. या बाईकमध्ये १५ कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या बाईकमध्ये एक मोठा ओडोमीटर आणि गोल लाईट आहे.