Bajaj CNG Bike: २५ वर्षांपूर्वी भारतात CNG-चालित ऑटो रिक्षा सादर करणारी बजाज ऑटो ही पहिली उत्पादक कंपनी होती, ज्याने सार्वजनिक वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आहे. आता, जेव्हा प्रवासी वाहनांमध्ये, विशेषत: फ्लीट आणि शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रात सीएनजी ही एक सामान्य गोष्ट ठरली आहे, तेव्हा बजाज पुन्हा एकदा बाजारपेठेत एक नवीन क्रांती घडवणार आहे, जी सीएनजी बाईकच्या रूपाने जगासमोर येईल.

बजाज दीर्घकाळापासून सीएनजी बाईकवर काम करत आहे आणि गेल्या वर्षभरात या सीएनजी बाईकची चाचणी अनेक वेळा पाहण्यात आली आहे. बाईक ५ जुलै २०२४ रोजी अधिकृत पदार्पण करणार आहे.

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Pune crowded Lakshmi road, Lakshmi road pune,
विश्लेषण : पुण्यातील गजबजलेला लक्ष्मी रस्ता होणार वाहनमुक्त! कर्कश हॉर्न, बेशिस्त पार्किंग, बेदरकार वाहनचालकांना चाप… कसा? कधी?
india hyperloop track ready
मुंबई-पुणे फक्त २५ मिनिटांत; पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार, याचा भारताला फायदा कसा होणार?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात बजाज CNG बाईकचे अनावरण होणार आहे. आगामी CNG बाइकच्या नावाबाबत अजूनही संदिग्धता आहे. पण चाकण-आधारित बाईक निर्मात्याने अलीकडेच भारतात ट्रेडमार्क केलेल्या या बाईकला ‘ब्रुझर’ म्हटले जाऊ शकते असे अहवालात सुचवले आहे. CNG बाईकचा परिचय हा भारत सरकारने गेल्या दशकात शाश्वत पर्यायी इंधनाच्या दिशेने उचललेल्या पावलांचा एक भाग आहे.

हेही वाचा – माही प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Citroen C3 Aircross ची धोनी एडीशन झाली लाँच; १०० भाग्यवान ग्राहकांना मिळेल खास भेटवस्तू

देशाच्या बहुतांश भागांमध्ये पेट्रोलच्या किमती १०० रुपयांच्या आसपास आहेत आणि पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यासाठी अजून खूप वेळ आहे. CNG किंवा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हे दुचाकी वाहनांसाठी योग्य पर्यायी उपाय ठरू शकतात आणि बजाज त्याचा फायदा घेणारे पहिले ठरणार आहे.

हेही वाचा – बाजारपेठेत उडाली खळबळ! बजाजचा नवा गेम; Pulsar आता नव्या अवतारात ४ रंगात देशात दाखल, किंमत…

बजाज सीएनजी बाइक: अपेक्षित तपशील

बजाज सीएनजी बाईक बहुधा डबल क्रॅडल फ्रेमवर आधारित असेल आणि त्यात ‘स्लोपर इंजिन’ असू शकते. या इंजिनाबाबत नेमका तपशील अद्याप समोर आलेले आहेत. हे ११०-१५० सीसी इंजिन असण्याची अपेक्षा आहे. नवीन CNG बाईकमध्ये १२५ सीसी इंजिन असेल जे पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालू शकेल आणि वेगवेगळ्या इंधनांमधील ट्रॅान्झीशन सोपे आणि अंखड असेल.

अतिरिक्त रेंज देण्यासाठी आणि CNG संपल्यास बॅकअप म्हणून काम करण्यासाठी या बाईकमध्ये एक लहान पेट्रोल टाकी देखील देण्यात आली आहे. विशेषत: किंमतीबद्दल जागरूक खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले, बजाजचा दावा आहे की, आगामी CNG बाइक ऑपरेटिंग आणि इंधन खर्च ५०-६५ टक्क्यांनी कमी करण्यास सक्षम असेल.

Story img Loader