आपण प्रत्येक जण हल्ली ४ व्हिलर वापरतो. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याजवळ एक तरी चार चाकी गाडी असायला हवी. मात्र आपण एखादी गाडी खरेदी करत असताना त्यात आपण फीचर्ससह आपल्या सुरक्षेची किती काळजी घेण्यात आली आहे हे सुद्धा तपासून पाहत असतो. गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे Airbags. एअरबॅग्ज हे एक सुरक्षेचे साधन आहे. अपघात झाल्यावर या एअरबॅग्ज ऑटोमॅटिक उघडतात आणि त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचण्यास मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व कार्समध्ये नियमांनुसार १ ऑक्टोबर २०२३ पासून सहा एअरबॅग्स असणे अनिवार्य आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने हा नियम लागू केला आहे. यापूर्वी, १ जानेवारी २०२२ रोजी किंवा त्यानंतर विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या होत्या. आज आपण अशा काही कार्सबद्दल जाणून घेणार आहोत त्यामध्ये ६ एअरबॅग्सचे सेफ्टी फिचर देण्यात आलेले आहे.

हेही वाचा : Toyota ने लॉन्च केली सुरक्षित Innova Crysta, ७ एअरबॅग्जवाली MPV पाहून इतर कंपन्यांचं टेन्शन वाढलं

Hyundai i20

Hyundai Grand i10 Nios च्या टॉप-स्पेक मॉडेलला सहा एअरबॅग मिळतात. या फीचरसह येणारी ही सर्वात स्वस्त कार आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत ७.९५ लाख रुपये ते ८.५१ लाख रुपये इतकी आहे. इतर सर्व व्हेरिएंट्सना चार एअरबॅग मिळतात. या कारमध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते. जे ८३ बीएचपी आणि ११४ एनएम टॉर्क जनरेट करते. ज्यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल AMT गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.

Maruti Suzuki Baleno

मारुती सुझुकी बलेनोमध्ये Zeta आणि Alpha ट्रीम्समध्ये सहा एअरबॅग मिळतात. अन्य व्हेरिएंट्स २ एअरबॅग मिळतात. यामध्ये एक १.२ लिटर इंजिन मिळते. जे पेट्रोल मोडमध्ये ९० एचपी आणि ११३ एनएम तर सीएनजी मोडमध्ये ७७.७ एचपी आणि ९८.५ टॉर्क जनरेट करते. यामध्ये ५ स्पीड MMT चा पर्याय मिळतो. या कारची एक्सशोरूम किंमत ही ८.३८ लाख ते ९.८८ लुकाः रुपयांच्या मध्ये आहे.

Hyundai Aura

Aura च्या फक्त टॉप-स्पेक SX (O) ट्रिमला सहा एअरबॅग मिळतात. बाकीच्या व्हेरिएंट्समध्ये चार एअरबॅग मिळतात. यामध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे जे ८३ एचपी पॉवर आणि ११४ एनएम टॉर्क जनरेट करते. या ट्रिमला फक्त ५ स्पीड मन्याला गिअरबॉक्स मिळतो. इया गाडीची एक्सशोरूम किंमत ८.६१ लाख रुपये इतके आहे.

हेही वाचा : TVS Motor Sales Report April 2023: टीव्हीएस मोटर्सने एप्रिल महिन्यात केली तब्बल ‘इतक्या’ लाख युनिट्सची विक्री

Toyota Glanza

ही कार मारुती बलेनोवर आधारित आहे. टोयोटा ग्लान्झा G आणि V ट्रिम्समध्ये सहा एअरबॅग्ज मिळतात. यात सीएनजी पॉवरट्रेनसह सहा एअरबॅग देखील मिळतात. या कारमध्ये १.२ लिटरचे इंजिन मिळते. जे पेट्रोल मोडमध्ये ९० एचपी पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क तसेच सीएनजी मोडमध्ये ७७ एचपी पॉवर आणि ९८.५ चे टॉर्क जनरेट करते. दोन्ही मोडमध्ये ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. या कारची एक्सशोरूम किंमत ही ८.६३ लाख ते १० रुपयांच्या मध्ये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baleno aura i 20 i 10 nios glanza cars with six airbags features tmb 01
Show comments