Viral Video : हल्ली गाड्या मग त्या दुचाकी असो की चारचाकी दररोजच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. आपल्यापैकी अनेक जण दररोज पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल भरायला जात असेल. पण तुम्हाला कधी असे वाटले का की पेट्रोल भरणारा कर्मचारी तुम्हाला फसवत आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये पेट्रोलपंपावर तुमच्या बरोबर करू शकतात असे तीन स्कॅम सांगितले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याबरोबर एक महिला भांडताना दिसते. त्यानंतर पुढे व्हिडीओत एक व्यक्ती सांगते की ही महिला यासाठी भांडण करत आहे कारण पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याची चोरी पकडली आहे. आता तुम्ही सुद्धा पेट्रोल पंपावरील तीन स्कॅमपासून स्वत:ला वाचवा. (be aware about three scam while filling petrol on petrol pump video goes viral)

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

१. सर्वात आधी पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हातावर नजर ठेवा. हे लोक पेट्रोल भरताना हळू हळू ट्रीप दाबतात ज्यामुळे एक एअरलॉग तयार होतो यामुळे हे लोक प्रत्येक लीटरवर ३० ते ५० मिली चा आपले नुकसान करते.

२. जेव्हा तुम्ही पेट्रोल भरता तेव्हा १०९, ६२१ या सारखे मधले आकडे सांगा. कारण अनेक पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक चिप्स पकडली आहे. ज्यामुळे १००० रुपयांचे पेट्रोल भरताना फक्त ९७० मिली चे पेट्रोल भरले जाते.

३. नेहमी डेन्सिटी नेहमी तपासा. पेट्रोलची ७३०-७७० किलोग्रॅम/मीटर क्युब आणि डिझेल ची ८३०-८६० किलोग्रॅम/मीटर क्युब पाहिजे .जर यापेक्षा कमी असेल तर समजावे की याची क्वालिटी खराब आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

fragrancemonika या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पेट्रोलपंपवर होणाऱ्या या तीन स्कॅम्सपासून वाचवा.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप चांगली माहिती दिली आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “चोर असतात, मी अनेकदा पकडले आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खरंय. माझ्याबरोबर असे घडले आहे.”

Story img Loader