तुम्हीही कार, मोटरसायकल, स्कूटर किंवा इतर कोणतेही वाहन चालवत असाल तर काळजी घ्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. खरं तर, मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ लागू झाल्यापासून २३ महिन्यांत देशभरात वाहतुकीच्या उल्लंघनासाठी ७.६७ कोटींहून अधिक चलन जारी करण्यात आले आहेत.

नवीन मोटार वाहन कायदा लागू होण्यापूर्वी २३ महिन्यांच्या कालावधीत वाहतूक चलनाची संख्या १,९६,५८,८९७ होती. नियम लागू झाल्यानंतर २३ महिन्यांच्या याच कालावधीत वाहतूक चालनाची संख्या ७,६७,८१,७२६ होती. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांची संख्या कॅलेंडर वर्ष २०१९ मध्ये ४,४९,००२ वरून २०२० मध्ये ३, ६६, १३८ वर आली आहे. सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीनंतर चलनाच्या संख्येत वाढ झाली आहे.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…

मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ मंजूर झाल्यानंतर त्यावर बराच गदारोळ झाला होता. किंबहुना, कायद्यात इतर बदलांव्यतिरिक्त, वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठ्या दंडाची तरतूद होती. नवीन कायद्यानुसार दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल दंडाची रक्कम २०० रुपयांवरून १०,००० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय रॅश ड्रायव्हिंगचा दंड १००० रुपयांवरून ५००० रुपये करण्यात आला आहे. लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास दंड ५०० रुपयांवरून ५००० रुपये करण्यात आला आहे. सीट बेल्ट किंवा हेल्मेट न लावल्याचा दंडही १०० रुपयांवरून १००० रुपये करण्यात आला आहे. दंडाची रक्कम दुचाकीच्या किमतीपेक्षा जास्त होती. यावर अनेक राज्यांनी हा नियम लागू न केल्याचे सांगितले होते.

वाहतूक नियम आणि दंड वाचा

गुन्हाआधीचा दंडआताचा दंड
सामान्य (१७७)१०० रूपये ५०० रूपये
रेड रेग्युलेशन नियम (१७७ ए) चे उल्लंघन १०० रूपये ५०० रूपये
अधिकाराच्या आदेशाची अवज्ञा (१७९) ५०० रूपये २००० रूपये
परवान्याशिवाय अनधिकृत वाहन चालवणे (१८०) १००० रूपये ५००० रूपये
अपात्रता असूनही वाहन चालवणे (१८२) ५०० रूपये १०००० रूपये
परवान्याशिवाय वाहन चालवणे (१८१) ५०० रूपये ५००० रूपये
ओव्हर साइज वाहन (१८२ बी) ५००० रूपये
ओव्हर स्पीडिंग (१८३) ४०० रूपये १००० रूपये
धोकादायक ड्रायव्हिंग (१८४) १००० रूपये ५००० रूपये
दारू पिऊन गाडी चालवणे (१८५) २००० रूपये १०००० रूपये
रेसिंग आणि वेगाने गाडी चालवणे (१८९) ५०० रूपये ५००० रूपये
ओव्हरलोडिंग (१९४)रु.२००० आणि रु.१०,००० प्रति टन अतिरिक्त२० हजार रुपये आणि २ हजार रुपये प्रति टन
सीट बेल्ट (१९४ बी) १०० रूपये १००० रूपये
परमिटशिवाय वाहन चालवणे (१९२ ए)५ हजार रुपयांपर्यंत१० हजार रुपयांपर्यंत
परवाना अटीचे उल्लंघन (१९३)काहीच नाही२५ हजार ते १ लाख रुपये
प्रवाशांचे ओव्हरलोडिंग (१९४ ए)काहीच नाही १००० रुपये प्रति पॅसेंजर
दुचाकीवर ओव्हरलोड१०० रुपये२ हजार रुपये आणि परवाना तीन महिन्यांसाठी रद्द
हेल्मेट घातले नसल्यास१०० रुपये१ हजार रुपये आणि परवाना तीन महिन्यांसाठी रद्द
इमर्जन्सी वाहनाला मार्ग देण्यात अयशस्वी (१९४ ई) काहीच नाही १०,००० रुपये
विम्याशिवाय वाहन चालवणे (१९६) १००० रूपये २००० रूपये
कागदपत्रे जोडण्याचा अधिकार्‍यांचा अधिकार (२०६)काहीच नाही१८३, १८४, १८५, १८९, १९०, १९४सी, १९४डी, १९४ई अंतर्गत वाहन चालविण्याचा परवाना रद्द केला जाईल
अधिकाऱ्यांच्या अंमलबजावणीद्वारे केलेले गुन्हे (२१० बी) काहीच नाही संबंधित कलमांतर्गत दोनदा दंड

Story img Loader