पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे तुम्हीही तुमच्या जुन्या कारमध्ये सीएनजी किट घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही CNG किट लावताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण कारमध्ये सीएनजी किट बसवणे हा मोठा निर्णय आहे.

अधिकृत डीलरकडूनच लावा किट

काही कार मालक स्वस्त किटसाठी कोणत्याही कार डीलरकडून त्यांच्या कारमध्ये किट बसवतात. तथापि, खराब दर्जाचे किट आणि अयोग्य फिटिंगमुळे गळती होऊ शकते, परिणामी आग लागू शकते किंवा आपण मोठ्या अपघातास बळी पडू शकता.

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Thieves run away carrying bullets by pretending to take test drive in Kondhwa
रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना
China Accident
China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी, दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी

(हे ही वाचा: Cheapest Car Loan: नवीन कार घेण्याचा विचार करत आहात? कोणती बँक देते स्वस्त कर्ज जाणून घ्या)

गाडीनुसार सीएनजी किट घ्या

कारमध्ये कोणतेही सीएनजी किट बसवण्यापूर्वी तुमची कार सीएनजी किटला सपोर्ट करेल की नाही हे जाणून घेतले पाहिजे. बर्‍याच वेळा असे होते की जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या कारमध्ये सीएनजी किट लावले तर त्यामुळे कारमध्ये अनेक समस्या येऊ लागतात. तुमच्या कारमध्ये सीएनजी किट सपोर्ट करेल की नाही हे आधी तुम्ही जाणून घ्या.

(हे ही वाचा: ‘या’ कंपनीने विकल्यानंतर ४ लाख कार मागवल्या परत; काय आहे कारण जाणून घ्या)

नेहमी ओरिजिनल किट लावा

कारमध्ये बसवलेले सर्व सीएनजी किट ओरिजिनल नसतात. अशा परिस्थितीत, तुमच्या कारमध्ये कोणतेही सीएनजी किट बसवण्यापूर्वी, त्याची गुणवत्ता नीट तपासा. यासोबतच त्याची गॅरंटी आणि सेफ्टी फीचर्स देखील तपासा.

(फोटो- LINE17)

इंजिनची वॉरंटी संपते

सीएनजी किट शोरूमच्या बाहेरून बसवल्यावर कारच्या इंजिनवरील वॉरंटी संपते. यामुळे युजर्सचेही नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, किट लावण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा.