Bentley Most Luxury SUV: ब्रिटीश लक्झरी कार उत्पादक कंपनी Bentley ने आपली Bentayga SUV एक्सटेंडेड व्हीलबेस (EWB) भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या लिमिटेड एडिशन मॉडेलचे केबिन देखील अपडेट केले गेले आहे, ज्यामुळे ते बेस व्हेरियंटपेक्षा अधिक प्रीमियम दिसते. यात ४.०-लिटर टर्बोचार्ज्ड V8 ट्विन-टर्बो इंजिन मिळेल.

बेंटले बेंटायगा SUV चा लूक

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर बेंटले बेंटायगा EWD वेरिएंटला मस्क्युलर SUV लुक देण्यात आला आहे. यात मस्क्यूलर बोनेट, मोठा क्रोम ग्रिल, क्रिस्टलीय एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), एअर स्प्लिटर आणि डिझायनर एअर डॅमसह गोल एलईडी हेडलाइट्स मिळतात. या एसयूव्हीच्या बाजूला ORVM, छतावरील रेल, फ्लेर्ड व्हील आर्च आणि २२-इंच अलॉय व्हील उपलब्ध आहेत. वाहनाचा व्हीलबेस आता ३,१७५mm आहे, जो मानक मॉडेलपेक्षा १८० mm अधिक आहे.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
panvel toll collector killed by speeding truck in Roadpali on Saturday
भरधाव ट्रकच्या धडकेत टोलवसुली कर्मचारी ठार 
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
(Photo-financialexpress)

(हे ही वाचा : १०० किमी रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर FREE मध्ये बुक करा, टॉप स्पीडही आहे जबरदस्त)

कार V8 इंजिनसह

EWB ला मानक मॉडेलपेक्षा अधिक शक्तिशाली ४.०-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन ५४२hp ची कमाल पॉवर आणि 770Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी, इंजिनला ८-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याच्या सध्याच्या मॉडेलमध्ये ३.०-लिटर टर्बोचार्ज्ड V6 हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हा सेटअप ४५०hp ची कमाल पॉवर आणि ७००Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

बेंटले बेंटायगा EWD SUV ची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Bentayga EWD ड्युअल-टोन डॅशबोर्ड, पॅनोरॅमिक सनरूफ, प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री, अॅम्बियंट लाइटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जर आणि मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हीलसह येते. यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसाठी सपोर्ट असलेली १०.९-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात मल्टिपल एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी आणि एडीएएस तंत्रज्ञान यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

बहुतेक वैशिष्ट्ये मागील सीटसाठी आहेत. येथे तुम्ही बटणाच्या मदतीने दरवाजे लॉक करू शकता. यात एअरलाइन सीट फीचर आहे, ज्यामुळे सीट ४० अंशांवर टेकवता येते.

(Photo-financialexpress)

(हे ही वाचा : मारुतीची ६ लाखाची ३३.८५ किमीचा जबरदस्त मायलेज देणारी ‘ही’ कार ३२ हजारात आणा घरी )

बेंटले बेंटायगा EWD SUV ची किंमत

रेंज-टॉपिंग EWB मॉडेल भारतात ६ कोटी रुपये (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आले आहे. या कारचे दोन व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात Azure आणि First Edition यांचा समावेश करण्यात आला आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत रोल्स राॅईस कलिननला टक्कर देईल.