8-Seater Cars In India: भारतीय बाजारात मोठ्या कारना मोठी मागणी दिसून येते. तुमच्या मोठ्या कुटुंबाला लांबच्या सहलीवर घेऊन जाण्यासाठी असो किंवा व्यावसायिक वापरासाठी असो, एमपीव्ही कारमध्ये उपलब्ध असलेल्या जास्त सीट्स तुमचे काम सोपे करते. भारतात उपलब्ध असलेल्या ७ सीटर कारची मोठी लिस्ट आहे. पण, जर तुम्हाला ७ सीट्सही कमी वाटत असतील तर आम्ही तुमच्यासाठी ८ सीटर कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. अनेक मोठ्या कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या ८ सीटर कार भारतीय बाजारात लॉन्च केल्या आहेत. मात्र, काही गाड्या अशा आहेत ज्या मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये बसत नाहीत. आज जाणून घेऊया काही ८ सीटर कार्सबद्दल ज्या मध्यमवर्गीय लोकांना देखील परवडतील.
‘या’ ८ सीटर कारची यादी पाहा
Mahindra Marazzo
महिंद्रा Marazzo MPV कार ही या विभागातील सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला एक प्रशस्त केबिन, मधल्या रांगेत कॅप्टन सीट्स आणि चांगले मायलेज मिळेल. या कारची किंमत १४.१० लाख रुपयांपासून सुरू होते. याला १.५-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे १२२PS/३००Nm जनरेट करते. हे ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. हे फक्त डिझेल इंजिनसह येते.
(हे ही वाचा : टाटाच्या ‘या’ स्वस्त SUV वर अख्खा देश फिदा, झाली दणक्यात विक्री, किंमत… )
Toyota Innova Crysta
Marazzo पेक्षा Toyota Innova Crysta किंचित जास्त महाग आहे, इनोव्हा क्रिस्टा उत्तम बिल्ड गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसह येते. यामध्ये तुम्हाला आरामदायी राइड, प्रशस्त इंटीरियर मिळेल. ही कार ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. ही कार ७ आणि ८ सीटर पर्यायांमध्ये येते. या कारच्या ८-सीटर व्हेरिएंटची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या MPV मध्ये याचा समावेश आहे.
Kia Carnival
किया इंडियाची प्रसिद्ध ८ सीटर कार किआ Carnival मानली जाते. या कारला बाजारातही खूप पसंती मिळत आहे. Kia Carnival मध्ये २१९९ cc डिझेल इंजिन आहे. हे इंजिन १९७ bhp च्या कमाल पॉवरसह ४४० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बाजारात ही प्रीमियम ८ सीटर कार मानली जाते. या कारची एक्स-शोरूम किंमत ४० लाख रुपयांपासून सुरू होते आणि ४५ लाखांपर्यंत जाते.
MG Hector Plus
एमजी मोटरची हेक्टर प्लस ही बाजारात आठ सीटरची शक्तिशाली कार मानली जाते. ही कार टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देते. एमजी हेक्टर प्लसमध्ये १९५६ सीसी इंजिन आहे. यामध्ये १४५१ सीसी इंजिन देखील उपलब्ध आहे. डिझेल आणि पेट्रोल असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत १७.३० लाख रुपयांपासून सुरू होते आणि २३.१३ लाख रुपयांपर्यंत जाते. यात स्टायलिश डिझाइन, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि प्रशस्त केबिन आहे.
Maruti Invicto
Invicto मध्ये ७ आणि ८ सीटर पर्याय देखील आहेत. त्याच्या आठ-सीटर व्हेरिएंटची किंमत २४.८४ लाख रुपये आहे. फक्त एक पॉवरट्रेन असून हायब्रिड सेटअपसह २-लीटर पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. ही इनोव्हा हायक्रॉसवर आधारित एमपीव्ही आहे.