Best 8 Seater Family Cars : तुमचे कुटुंब मोठे आहे आणि तुम्ही अशा कारच्या शोधात आहात ज्यात संपूर्ण कुटुंब बसून आरामात प्रवास करू शकेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसेल अशा आठ सीटर कारबद्दल माहिती देणार आहोत. अगदी पाच सीटर कारच्या किमतीत तुम्ही या कार खरेदी करू शकता आणि कुटुंबासह विकेंडला फिरायला जायचा प्लॅन करू शकता. या कार अतिशय आरामदायी आहेतच, शिवाय त्यातील एक एक फीचरदेखील जबरदस्त आहे. या बेस्ट बजेट फ्रेंडली आठ सीटर फॅमिली कार कोणत्या जाणून घेऊ…

मारुती सुझुकी इनव्हिक्टो (Maruti Suzuki Invicto)

मारुती सुझुकी इनव्हिक्टो दोन ट्रिम्समध्ये येते, Zeta+ आणि Alpha+. यात 7-8 सीटर कॉन्फिगरेशनचा पर्याय आहे. मारुती सुझुकी इनव्हिक्टोमध्ये 2 लिटर पावरफूल हायब्रिड इंजिन आहे, जे १५२ पीएस पॉवर आणि १८८ एनएम टॉर्क जनरेट करते.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
dombivli donkey parking
डोंबिवलीत सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभे करणाऱ्यांना गाढवाची उपमा, टाटा लाईनखाली दुचाकी वाहनांचे बेशिस्त वाहनतळ
rupali bhosale buys new mercedes car
मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर
Honda new year discount honda car offers upto 90,000 discount in January
HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125 : कोणती दुचाकी आहे लयभारी? फिचर्सपासून किंमतीपर्यंत; जाणून घ्या, एका क्लिकवर

भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत २५.११ लाख ते २८.९२ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. Invicto 8-सीटरची किंमत २५.२६ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यामध्ये तुम्हाला १०.१ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स मिळतात.

याशिवाय व्हेंटिलेटे़ड फ्रंट सीट्स, ३६० डिग्री कॅमेरा आणि पॅनोरामिक सनरूफ यांसारखी अॅडव्हॉन्स फीचर्सदेखील यामध्ये आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात सहा एअरबॅग, व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारख्या सुविधा आहेत.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ( Toyota Innova Crysta)

या कारला भारतात खूप मागणी आहे. त्याची किंमत १९.९९ लाख रुपये ते २६.५५ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हे चार ट्रिम्स GX, GX Plus, VX आणि ZX मध्ये उपलब्ध आहे. यात ७ आणि ८-सीटर कॉन्फिगरेशनचा पर्याय आहे.

इनोव्हेटिव डिझाइन आणि आरामदायी प्रवासासाठी ८ सीटर टोयोटा इनोव्हा क्रिस्टामध्ये २.४ लिटर पॉवर फूल डिझेल इंजिन आहे. हे इंजिन १५० bhp पॉवर आणि ३४३ Nm टॉर्क जनरेट करते.

यातील फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, इनोव्हा क्रिस्टामध्ये ८-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रीअर एसी व्हेंटसह ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, ८-वे पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि ॲम्बियंट लाइटिंग यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा – तुमची जुनी कार स्क्रॅप केल्यावर मिळणार ‘एवढी’ सवलत, नवीन कार खरेदीवर किती होईल बचत? काय म्हणाले नितीन गडकरी…

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross)

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या ८ सीटर व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १९.७७ लाख ते ३०.९८ लाख रुपये आहे. इनोव्हा हायक्रॉसमध्ये इलेक्ट्रिक मोटरसह २-लिटर पेट्रोल इंजिन आहे.

हे हायब्रिड इंजिन १८६ पीएस पॉवर आणि २०६ एनएम टॉर्क जनरेट करते, तर त्याचे नॉन-हायब्रीड व्हर्जन १७४ पीएस पॉवर आणि २०५ एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये हायब्रिड इंजिनसह ई-सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे.

यात ADAS सारख्या अॅडव्हॉन्स सेफ्टी फीचर्स आणि १०-इंचाचा टचस्क्रीम इन्फोटेनमेंट डिस्प्ले, ट्विन १० इंज रियर पॅसेंजर डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हेंटिलेटेड सीट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखे फीचर्स आहेत.

Story img Loader