Best CNG Cars list: डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त सीएनजी कारलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कारण- पेट्रोल आणि डिझेल कार वापरणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या किमतींनी हैराण केले आहे. कारने लांबचा प्रवास करण्यासाठी पेट्रोल व डिझेलकरिता जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेक जण आता सीएनजी कारला प्राधान्य देत आहेत.

बाजारात सर्वोत्कृष्ट अशा सीएनजी कार मोठ्या संख्येने येत आहेत, ज्या कमी किमतीत दीर्घ मायलेजचा दावा करतात. तुम्हीही सीएनजी कार घेण्याचा विचार करीत असाल, तर ही तुमच्यासाठी उपयुक्त अशी बातमी आहे. वास्तविक, भारतीय बाजारपेठेत कारची अशी अनेक मॉडेल्स आली आहेत, जी तुम्हाला CNG वर उत्तम मायलेज तर देतातच; पण ती बजेट सेग्मेंटमध्येही उपलब्ध आहेत. त्यामध्ये देशांतर्गत कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स, ह्युंदाई इंडिया, मारुती सुझुकी व टोयोटा यांच्या कारचा समावेश आहे. या मॉडेल्समध्ये तुम्हाला प्रति किलोग्राम सीएनजीमध्ये कमाल ३४ किलोमीटरचा मायलेज मिळतो. अशा पाच सीएनजी मॉडेल्सबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ, जे तुम्हाला फक्त चांगले मायलेजच देत नाहीत, तर बजेट सेग्मेंटमध्येही येतात.

भारतातील ‘५’ बेस्ट सीएनजी कार

मारुती सुझुकी अल्टो K10 CNG

जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत उत्तम मायलेज असलेली सीएनजी कार घेण्याचा विचार करीत असाल, तर मारुती सुझुकी अल्टो K10 हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. मारुती सुझुकी अल्टो K10 च्या CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ५.७३ लाख रुपये आहे. ही कार ग्राहकांना ३४ किमी मायलेज देण्याचा दावा करते. या कारला भारतीय बाजारात ग्राहकांची मोठी पसंती दिसून येते.

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी

मारुती सुझुकी सेलेरियोचे सीएनजी मॉडेलदेखील परवडणाऱ्या किमतीत चांगले मायलेज देण्याच्या दृष्टीने उत्तम पर्याय ठरू शकतो. मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी आपल्या ग्राहकांना ३४ किमी मायलेज देण्याचा दावा करते. भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ६.७३ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी

मारुती सुझुकी वॅगनआरचे सीएनजी मॉडेल, जे भारतीय ग्राहकांमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी आपल्या ग्राहकांना ३३ किमी मायलेज देण्याचा दावा करते. भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ६.४ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी

जर तुम्ही नवीन सीएनजी कार घेण्याचा विचार करीत असाल, तर मारुती सुझुकी एस-प्रेसोचे सीएनजी मॉडेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मारुती सुझुकी S-Presso चे CNG मॉडेल आपल्या ग्राहकांना ३३ किमी मायलेज देण्याचा दावा करते. तर, ही कार भारतीय बाजारपेठेत ग्राहकांना ५.९१ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

टाटा टियागो सीएनजी

भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उत्तम इंधन कार्यक्षमतेसह Tiago CNG मॉडेल ऑफर करते. या कारने ग्राहकांना २६ किमी मायलेज देण्याचा दावा केला आहे. भारतीय बाजारात Tata Tiago CNG ची एक्स-शोरूम किंमत ७.५४ लाख रुपये आहे.

आता वरील माहितीच्या आधारे तुम्ही ठरवा, कोणती CNG कार असेल तुमच्यासाठी खास…