जर तुम्ही बजेटमध्ये आणि जबरदस्त सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, सध्या भारतीय बाजारपेठेत सीएनजी कारची मागणी सातत्याने वाढतेय. अनेक मोठ्या कंपन्या लो बजेट सेगमेंटमध्ये सीएनजी कार ऑफर करत आहेत, , ज्या मायलेजच्या बाबतीत टॉपवर आहेत. आम्ही तुम्हाला अशा ३ सीएनजी बजेट कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कमी किंमतीतील सीएनजी कार

१) मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10)

ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. याशिवाय ती अनेक ग्राहकांच्या पसंतीची कार आहे. मारुती सुझुकीच्या अल्टो K10 च्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरून देखील लावू शकता की, भारतात आतापर्यंत या कारच्या ५० लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ५.७४ लाख रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार १ किलोग्रॅम सीएनजी मध्ये ३३.८५ किलोमीटर मायलेज देते.

२) मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)

तुम्ही सीएनजी पॉवरट्रेन असलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मारुती WagonR चा पर्याय म्हणून विचार करू शकता. ही कार भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कारपैकी एक आहे. मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजीची सुरुवातीची किंमत ६.४५ लाख रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार १ किलोग्रॅम सीएनजीमध्ये ३३.४७ किलोमीटर मायलेज देते.

कार्तिक आर्यनच्या कारचे उंदरांमुळे करोडोंचे नुकसान; तुमची गाडी सुरक्षित ठेवायची तर आजच ‘हे’ करा

३) टाटा पंच (Tata Punch)

टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी ही एक आहे. याशिवाय B-NCAP द्वारे टाटा पंचची अलीकडेच क्रॅश चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये या कारने पूर्ण पाच गुण मिळवले आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ७.२३ लाख रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, टाटा पंच १ किलोग्राम सीएनजीमध्ये २६.९९ किलोमीटर धावेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best cnr budget cars car buyer guide best 3 cng cars under rs 8 lakh in india 2024 check list sjr