Best Mileage Car Diwali Offer: भारतातातील सर्वात बेस्ट मायलेज देणारी कार असा दावा करणाऱ्या मारुतीच्या अल्टो गाडीवर दिवाळीच्या निमित्ताने बंपर ऑफर मिलर आहे. किंमत कमी व फायदे जास्त असं कमाल समीकरण देणाऱ्या Maruti Alto 800 च्या बेस मॉडेलची बाजारात प्रचंड चर्चा आहे. मारुति ऑल्टो 800 च्या चार व्हेरियंटसह ही गाडी कंपनीने बाजारात आणली होती. यंदा दिवाळीच्या निमित्त या बहुचर्चित गाडीवर मोठे डिस्काउंट मिळत आहे. अवघ्या ३८ हजाराच्या डाउनपेमेंटवर आपण ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता. मारुती अल्टो ८०० चे फीचर्स व किंमत आपण सविस्तर पाहुयात तसेच जर तुम्ही ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बजेट कसे जुळवावे लागेल याची सोपी आकडेमोडही जाणून घेऊयात, चला तर मग..
Maruti Alto 800 किंमत
मारुति ऑल्टो 800 च्या बेस मॉडेलची किंमत (एक्स शो रूम) ३ लाख ३९ हजार इतकी तर ऑन रोड किंमत ३ लाख ७८ हजार ७५७ रुपये इतकी आहे.
दिवाळीत ७७ रुपयांच्या EMI वर खरेदी करा नवीकोरी Bajaj CT 110X Bike; पहा भन्नाट फीचर व स्वस्त प्लॅन
Maruti Alto 800 वर दिवाळी ऑफर
यंदाच्या दिवाळीत मारुति ऑल्टो आपल्या ग्राहकांना २९ हजाराचे मोठे डिस्काउंट देत आहे, यामध्ये कॅश डिस्काउंटसह एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट व अन्यही लाभ समाविष्ट आहेत.
Maruti Alto 800 साठी बजेट कसे जुळवाल?
आता आपण साधी सोपी आकडेमोड पाहुयात, दिवाळीच्या ऑफरसहित मारुती ऑल्टो विकत घ्यायची असल्यास आपण बँकेच्या कार लोनचा विचार करू शकता. ईएमआयवर बँकेकडून आपल्याला ३ लाख ४० हजार ७५७ एवढे कर्ज मिळू शकते यावर ९.८ टक्के इतका वार्षिक व्याजदर असेल. कर्ज मान्य झाल्यास आपल्याला केवळ ३८ हजार डाऊन पेमेंटसह कार खरेदी करता येईल. यानंतर ५ वर्षांसाठी आपल्याला महिन्याला ७ हजार २०७ रुपयांच्या ईएमआय भरावा लागेल.
धनत्रयोदशीला वाचवा ३ लाख रुपये; दिवाळी निमित्त महिंद्रा व Hyundai SUVs वर मोठी सूट
Maruti Alto 800 इंजिन क्षमता व फीचर्स
मारुति ऑल्टो मध्ये ७९६ सीसी चे ०.८ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, ज्यात ४८ पीएस पॉवर व ६९ एनएम पीक स्टार्ट दिला आहे. इंजिनासह गाडीत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मायलेजच्या बाबत सांगायचे तर मारुति ऑल्टो पेट्रोल वर २२. ०५ किमी प्रति लिटर तर सीएनजीवर ३१. ५९ किमी प्रति लिटर इतके मायलेज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हे मायलेज ARAI तर्फे प्रमाणित आहे.
मारुती ऑल्टो मध्ये आपल्याला अँड्रॉइड ऑटो व ऍपल कारप्ले कनेक्टिव्हीटीसह ७ इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. कीलेस एंट्री, फ्रंट पॉवर विंडो, फ्रंट सीट ड्युअल एअरबॅग्स, रियर पार्किंग सेंसर, ईबीडी, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम असे विविध फीचर या कारमध्ये देण्यात आले आहेत.