प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे एक चांगली चारचाकी कार असावी. कार खरेदी करत असताना अनेकजण नेमकी कोणती कार खरेदी करावी? तिचं बजेट किंवा रंग कोणता असावा? यासाठी मोठी तयारी करतात. अनेक कार भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. खरेदी करताना कोणती कार घ्यावी, यासाठी मोठा गोंधळ उडतो. कार खरेदी करताना कारचे फीचर्स, लूक डिझाईन, मायलेज या सर्व गोष्टींकडे ग्राहकांचा विशेष लक्ष असतो. भारतीय बाजारात अशी एक मारुतीची कार आहे, जी ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे.
गेल्या वर्षी भारतीय बाजारात दाखल झालेली मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही एक अशी कार आहे ज्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही कार खरेदीदारांच्या प्रत्येक पॅरामीटर्सची पूर्तता करत आहे. ग्रँड विटारामध्ये चांगली जागा, चांगली रचना, उच्च ग्राउंड क्लीयरन्स, शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमुळे ग्रँड विटारा या सेगमेंटमधील इतर वाहनांना टक्कर देत आहे. ही कार दीर्घकाळ टिकू शकते.
(हे ही वाचा : बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी)
किंमतदेखील कमी
मारुती सुझुकी ग्रँड विटारा गेल्या वर्षी २६ सप्टेंबर रोजी भारतात लाँच झाली होती. ग्रँड विटाराची ऑन-रोड किंमत १२.५० लाख रुपयांपासून सुरू होते आणि २३ लाखांपर्यंत जाते. ग्रँड विटारा सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा+ आणि अल्फा+ या सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या डेल्टा सीएनजी व्हेरिएंटवर सहा ते आठ आठवड्यांचा जास्तीत जास्त वेटिंग पीरियड चालू आहे. इतर सर्व व्हेरिएंटसाठी दोन-तीन आठवड्यांचा वेटिंग पीरियड आहे. Grand Vitara मध्ये पाच लोकांसाठी बसण्यासाठी पुरेशी जागा आहे. ग्रँड विटारा किआ सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा, एमजी एस्टर, टाटा हॅरियर, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन तैगुन यांच्याशी स्पर्धा करते.
डिझाइन आकर्षक
मारुती सुझुकी ग्रँड विटारा नऊ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन, नवीन १६-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, रॅपराऊंड एलईडी टेल लाइट्स, शार्क-फिन अँटेना, सर्वत्र प्लास्टिक क्लेडिंग आणि उच्च माउंट स्टॉपसह सुसज्ज आहे. इंटिग्रेटेड स्पॉयलरसारखे डिझाईन घटक त्याच्यासोबत उपलब्ध आहेत.
मायलेज
मारुती ग्रँड विटाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या कारचे मजबूत मायलेज. कंपनी ही कार सौम्य आणि मजबूत हायब्रीड प्रकारात देत असल्याने तिचे मायलेज उत्कृष्ट आहे. ग्रँड विटाराच्या विविध प्रकारांना १९.३८ ते २७.९७ kmpl पर्यंत मायलेज मिळते.