Best Selling 7 Seaters Car February 2023: देशात सात सीटर कारलाही चांगली मागणी आहे. टोयोटा इनोव्हा आणि मारुती एर्टिगा यांना चांगलीच पसंती आहे. आता मात्र महिंद्राने हा विभाग व्यापलेला दिसत आहे. महिंद्राच्या दोन गाड्यांनी एर्टिगाला मागे टाकत बेस्ट सेलिंग सात सीटरचा किताब पटकावला आहे. येथे आम्ही तुमच्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या ७ सीटर कारची यादी घेऊन आलो आहोत, चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या कार…
फेब्रुवारी महिन्यात ‘या’ आहेत देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या ७ सीटर कार
१. Mahindra Bolero
महिंद्रा बोलेरो ही फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विकली जाणारी सात सीटर कार होती. त्याने नवीन स्कॉर्पिओ-एन आणि मारुती सुझुकी एर्टिगालाही मागे टाकले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी घट झाली असली तरी एकूण ९,७८२ मोटारींची विक्री झाली आहे.
(हे ही वाचा : १ किंवा २ लाख नव्हे तर तब्बल ३.६० लाख रुपयांनी स्वस्त झाली ‘ही’ लोकप्रिय कार, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड )
२. Mahindra Scorpio
महिंद्रा स्कॉर्पिओ ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी ७ सीटर कार ठरली आहे. त्याची देशांतर्गत विक्री फेब्रुवारी २०२३ मध्ये ६,९५० युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जी २०२२ मधील त्याच महिन्याच्या तुलनेत १६६ टक्क्यांनी सकारात्मक वाढ दर्शवते. Scorpio-N आणि Scorpio Classic गेल्या वर्षीच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते, तेव्हापासून या दोन्ही गाड्यांना मोठी मागणी आहे.
३. Maruti Suzuki Ertiga
मारुती सुझुकी एर्टिगा तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत एर्टिगाच्या एकूण विक्रीचा आकडा ४४ टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या महिन्यात ६,४७२ मोटारींची विक्री झाली. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याची ११,६४९ युनिट्स विकली गेली.
(हे ही वाचा : Royal Enfield Classic 350 च्या किमतीत खरेदी करा मारुतीची ‘ही’ लोकप्रिय कार, ऑफर जाणून होणार थक्क )
४. Kia Carens
Kia Carens ही ७ सीटरची चौथी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. त्याची देशांतर्गत विक्री फेब्रुवारी २०२३ मध्ये ६,२४८ युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जी २०२२ मधील त्याच महिन्याच्या तुलनेत २२ टक्क्यांनी सकारात्मक वाढ दर्शवते. फेब्रुवारी २०२२ मध्ये, त्याची ५,१०९ युनिट्सची विक्री झाली.
५. Mahindra XUV700
महिंद्रा XUV700 ने ४,५०५ युनिट्सच्या विक्रीसह ९ टक्के वार्षिक वाढ नोंदवली, ज्यामुळे ती भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी ७-सीटर कार बनली.