Bestselling Activa 2024: भारतात अनेक कंपन्यांच्या स्कूटर उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही किंमत आणि परफॉर्मन्सनुसार तुमच्या आवडीची स्कूटर निवडू शकता. तथापि, सर्वांत जास्त विकल्या जाणाऱ्या स्कूटरचा विचार केला तर, त्यात होंडाच्या लोकप्रिय ॲक्टिव्हा स्कूटरने आपले स्थान निर्माण केले आहे. या अ‍ॅक्टिव्हाची खरेदी करण्यासाठी ग्राहक आकर्षित होत आहेत. ही स्कूटर या वर्षातील सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर ठरली आहे. या स्कूटरची भारतभर मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे आणि त्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहवाल काय म्हणतो?

गेल्या ऑक्टोबरच्या विक्री अहवालात, अग्रगण्य १० स्कूटरच्या ६.६४ लाख युनिट्सची विक्री झाली, जी दरवर्षीच्या प्रमाणात २७ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यामध्ये होंडा ॲक्टिव्हा पहिल्या स्थानावर आहे आणि त्याला २.६६ लाखांहून अधिक नवीन ग्राहक मिळाले आहेत. ओला आणि बजाजसोबत TVS च्या इलेक्ट्रिक स्कूटरचादेखील अग्रगण्य १० स्कूटरच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा… गुगल मॅप्सच्या या ट्रिकने तुम्हाला कधीच चलन भरावे लागणार नाही, जाणून घ्या हा जुगाडू हॅक

होंडा ॲक्टिव्हा (Honda Activa)

होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिआच्या ॲक्टिव्हा स्कूटरने गेल्या ऑक्टोबरमध्ये २,६६,८०६ युनिट्सच्या विक्रीसह २२% इतकी वार्षिक वाढ नोंदवली आहे. त्यांच्या 6G मॉडेलची किंमत ७७ हजार रुपयांपासून सुरू होते आणि ही किंमत लोकांच्या बजेटमध्ये सहज बसते.

टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter)

या यादीतील दुसरे नाव टीव्हीएस ज्युपिटरचे आहे. या स्कूटरने विक्रीच्या बाबतीत होंडा ॲक्टिव्हाला टक्कर दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या १,०९,७०२ युनिट्सची विक्री झाली. वार्षिक वाढीबाबत बोलायचे झाले, तर यंदा त्यात १९.४७ टक्के वाढ झाली आहे.

सुझुकी अ‍ॅक्सेस (Suzuki Access)

या स्पर्धात्मक यादीतील तिसरे नाव सुझुकी अ‍ॅक्सेस स्कूटरचे आहे. ऑक्टोबर महिन्यात ७४,८१३ ग्राहकांनी ही स्कूटर खरेदी केली होती आणि त्यात ३१ टक्के इतकी वार्षिक वाढ झाली आहे.

हेही वाचा… New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग

ओला S1 (Ola S1)

होंडा, टीव्हीएस व सुझुकीनंतर या यादीतील चौथे नाव ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरचे आहे. ऑक्टोबर महिन्यात ४१,६५१ ग्राहकांनी ही स्कूटर खरेदी केली होती. या स्कूटरची वार्षिक वाढ ७४ टक्के आहे.

टीव्हीएस एनटॉर्क (TVS Ntorq)

टॉप- ५ मधील या यादीतील पाचवे नाव TVS Ntorq स्कूटरचे आहे. ऑक्टोबर महिन्यात ४०,००० ग्राहकांनी ही स्कूटर खरेदी केली होती. या स्कूटरची वार्षिक वाढ १६ टक्के इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best selling activa in 2024 honda activa sale hikes by 22 percent tvs suzuki ola is in the toplist dvr