Best Selling Mahindra Car: दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्राच्या कार देशभरात खूप पसंत केल्या जातात. महिंद्राच्या कारची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होत असते. महिंद्राच्या सात सीटर कारला देशातील बाजारात मोठी मागणी दिसून येते. तुम्ही पॉवरफूल, स्टायलिश आणि सुरक्षित एसयूव्ही शोधत असाल, तर महिंद्राच्या एका कारला चांगली पसंती दिसून येत आहे. २००२ मध्ये लाँच झालेली ही कार त्याच्या पॉवरफूल इंजिन, उत्कृष्ट लुक आणि ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे आणि या कारला कंपनीने आता नव्या अवतारात सादर केलं असून नव्या अवतारात सादर झालेल्या कारला देशातील बाजारपेठेत चांगली मागणी दिसून येत आहे.
कार खरेदी करताना लोकांनी सुरक्षेबरोबरच उपयुक्ततेवरही लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महिंद्रा स्कॉर्पिओसारख्या मोठ्या एसयूव्हींची चांगली विक्री होत आहे. इतकंच नाही तर या सेगमेंटमध्ये अनेक मॉडेल्स येऊ लागली आहेत, ज्यामुळे ग्राहकांकडे भरपूर पर्याय आहेत. कार कंपन्यांनी त्यांच्या जून महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले असून त्यात महिंद्रा स्कॉर्पिओने विक्रीच्या बाबतीत पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओचे अजूनही एसयूव्ही विभागात वर्चस्व आहे. विक्रीच्या बाबतीत, या कारनं स्वतःच्या XUV 700 ला मागे टाकले आहे.
(हे ही वाचा : किंमत ७.७३ लाख, मायलेज २८.०५ किमी; ‘या’ SUV ला तुफान मागणी अन् आता वेटिंग पीरियड झाला कमी )
महिंद्रा स्कॉर्पिओ हे भारतातील एसयूव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. सर्व भारतीयांनी महिंद्राच्या स्कॉर्पिओला प्रचंड पसंती दिली असून, सात सीटर कारच्या विक्रीत ही कार अग्रस्थानी दिसून आली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओने गेल्या महिन्यात १२,३०७ गाड्यांची विक्री केली होती तर गेल्या वर्षी कंपनीने ८,६४८ गाड्यांची विक्री केली होती. जून महिन्यात स्कॉर्पिओचा बाजारातील हिस्सा ५१.३१ टक्के होता. याशिवाय टाटा सफारीने गेल्या महिन्यात १,३९४ कारची विक्री केली होती.
Mahindra Scorpio-N दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात २.०-लीटर टर्बो पेट्रोल आणि २.२-लीटर डिझेल इंजिनचा पर्याय असेल. दोन्ही इंजिन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहेत. Mahindra Scorpio-N ची एक्स-शोरूम किंमत १६.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये या कारला ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.
Mahindra Scorpio-N मध्ये वैशिष्ट्यांची लांबलचक यादी आहे. यात ६-वे ड्रायव्हर पॉवर ॲडजस्टेबल सीट, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, अलॉय व्हील आहेत. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये येते. याशिवाय, यात इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) वैशिष्ट्य आहे जे खूप महत्त्वाचे मानले जाते. स्कॉर्पिओ ही अनेक प्रकारे एक उत्तम एसयूव्ही आहे, जेव्हापासून या कारचा नवीन अवतार बाजारात आला आहे तेव्हापासून या कारच्या विक्रीतही वाढ झाली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd