Car Sales: सध्या भारतीय ऑटोमोबाईलमध्ये चलतीचे दिवस सुरु आहेत. जवळपास सर्वच सेगमेंटमधील कार्सला ग्राहकांकडून चांगली मागणी वाढली आहे. भारतीय ग्राहकांमध्ये हॅचबॅक कारला चांगली मागणी आहे. या गाड्या त्यांच्या उत्कृष्ट मायलेज आणि कॉम्पॅक्ट आकारामुळे खूप पसंत केल्या जातात. आकारामुळे, शहरातील रहदारीमध्ये त्यांचा वापर करणे देखील खूप सोपे आहे. जेव्हा हॅचबॅक कार प्रगत वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानासह येतात, तेव्हा त्यांना प्रीमियम हॅचबॅक म्हणतात.

‘या’ कारनं ग्राहकांना लावलं वेड

मार्च महिन्यात, मारुती बलेनो (Maruti Suzuki Baleno) प्रिमियम हॅचबॅक कारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि ती सेगमेंटमधील नंबर वन कार बनली आहे. यासोबतच देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. मारुती सुझुकी बलेनो ही कार तिच्या सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे, जी चांगल्या हाईटसह अनेक खास फीचर्ससह येते. यात पाच लोक बसू शकतात.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

(हे ही वाचा : Maruti Alto, Wagon R ला विसरुन देशातील ‘ही’ सर्वात स्वस्त ५ सीटर कार खरेदीसाठी लागल्या रांगा, २३.७६ kmpl मायलेज )

मार्च महिन्यात मारुती बलेनोच्या १६,१६८ युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती बलेनोशी स्पर्धा करणाऱ्या Hyundai i20 ने मार्चमध्ये ६,५९६ युनिट्सची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे टाटा अल्ट्रोजची स्थितीही फारशी चांगली नाही. Honda Jazz देखील या सेगमेंटमध्ये होती, पण ती बंद करण्यात आली आहे.

किंमत

मारुती सुझुकी बलेनो सिग्मा, डेल्टा, डेल्टा सीएनजी, झेटा, झेटा सीएनजी आणि अल्फा या सहा प्रकारांमध्ये विकली जाते. मारुती बलेनोची किंमत प्रकारानुसार ६.६१ लाख ते ९.६९ लाख दरम्यान आहे. नवीन फेसलिफ्टेड मारुती बलेनो २३ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतात लाँच करण्यात आली.