Best Selling 7-Seater: भारतीय बाजारपेठेत सात सीटर एसयुव्ही आणि एमपीव्ही गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. एकत्र कुटुंबपद्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून त्यामुळे बाजारात सात सीटर कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच आता कंपन्याही त्यांच्या ५-सीटर SUV कारचे सात-सीटर मॉडेल्स लाँच करत आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ हे या सेगमेंटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, परंतु एक अशी कार आहे जिचा दबदबा बाजारपेठेत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि ही कार वर्षभर तिच्या सेगमेंटमधील विक्रीच्या बाबतीत नंबर-वन राहिली आहे. या कारची गेल्या महिन्यात १४,८८८ युनिट्स विकली गेली आणि तिची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ही कार कंपनीच्या अनेक स्वस्त कारपेक्षा चांगली कामगिरी करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही ज्या सात-सीटर कारबद्दल बोलत आहोत ती मारुती सुझुकीची Ertiga MPV कार आहे, जी सात-सीटर MPV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. मारुती सुझुकीची खिशाला परवडणारी सात सीटर एमपीव्ही Ertiga ही सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. गेल्या महिन्यात एर्टिगाच्या १४,८८८ युनिट्सची विक्री झाली होती, वार्षिक आधारावर या कारच्या विक्रीत ६५ टक्क्यांनी वाढ झाली, असल्याची माहिती आहे.

(हे ही वाचा : एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम )

बोलेरो आणि स्कॉर्पिओला टाकले मागे

मार्चच्या टॉप-१० कारच्या यादीमध्ये, मारुती एर्टिगा आणि महिंद्रा स्कॉर्पिओ ही दोनच मॉडेल्स आहेत ज्यांनी वार्षिक आधारावर सर्वाधिक वाढ केली आहे. स्कॉर्पिओला ७२ टक्के वार्षिक वाढ मिळाली तर एर्टिगाला ६५ टक्के वार्षिक वाढ मिळाली. एर्टिगाच्या मागणीचा अंदाज यावरूनही लावला जाऊ शकतो की त्याला दरमहा सुमारे १४,००० ग्राहक मिळत आहेत. यापुढे बोलेरो, इनोव्हा, फॉर्च्युनर ही मॉडेल्सही अपयशी ठरत आहेत.

सहा महिन्यांची विक्री कशी झाली?

गेल्या सहा महिन्यांतील मारुती एर्टिगाच्या विक्रीवर नजर टाकली तर ही कार ऑक्टोबर २०२३ मध्ये १४,२०९ युनिट्स, नोव्हेंबर २०२३ मध्ये १२,८५७ युनिट्स, डिसेंबर २०२३ मध्ये १२,९७५ युनिट्स, जानेवारी २०२४ मध्ये १४,६३२ युनिट्स, जानेवारी २०२४ मध्ये १५,०१९ युनिट्स आणि फेब्रुवारीमध्ये १५,०४२ युनिट्सची विक्री झाली. मार्च २०२४ मध्ये १४,८८८ युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच ६ महिन्यांत एकूण ८५,०८० युनिट्सची विक्री झाली.

इंजिन आणि किंमत

सर्वाोत्तम फीचर्ससह सुसज्ज असलेली कार म्हणजे मारुती एर्टिगा, ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर कार आहे. या कारची किंमत ८.६४ लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये येते. ही एक एमपीव्ही कार आहे. यामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन माईल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीसह सुसज्ज आहे. यातलं इंजिन १०३PS पॉवर आणि १३७Nm टॉर्क आउटपुट देऊ शकतं. सीएनजीवर ही कार २६ किमीपर्यंतचं मायलेज देते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best selling car maruti suzuki ertiga continued to captivate indian families with sales reaching 14888 units pdb
Show comments