Best Selling Cars: आज देशातील बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक गाड्या विकल्या जात आहेत, पण काही मोजक्याच कार आहेत ज्या आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. टॉप १० म्हणजेच सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत नेहमीच मारुती सुझुकीच्या कारचा बोलबाला पाहायला मिळतो.
फेब्रुवारी महिन्यात देशात प्रवासी वाहनांची तुफान विक्री झाली आहे. या यादीत हॅचबॅक कार्सचा नेहमीप्रमाणे दबदबा पाहायला मिळाला. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० कारच्या यादी पाहिल्यास मारुती सुझुकीचा बाजारावरील वरचष्मा पाहायला मिळेल. फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत सर्वाधिक कार मारुती सुझुकीच्या आहेत. त्यानंतर ह्युंदाई आणि महिंद्राच्या गाड्यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर टाटा मोटर्सच्या कार आणि किया आणि टोयोटाच्या कारचा क्रमांक लागतो.
(हे ही वाचा :मार्चमध्ये मारुतीच्या ‘या’ SUV कारवर तगडा डिस्काउंट जाहीर; पाहा भन्नाट ऑफर, होईल तुमच्या पैशांची बचत )
जेव्हा जेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार खरेदी करण्याची चर्चा होते तेव्हा त्या कंपनीच्या नावात मारुती सुझुकीचे नाव येते आणि कारचे नाव आल्यावर सर्वात पहिले नाव मनात येते ते म्हणजे WagonR. मारुती वॅगनआर ही फेब्रुवारी २०२४ मध्ये १९ हजार ४१२ युनिट्सच्या विक्रीसह सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. १८ हजार ४३८ मोटारींच्या विक्रीसह टाटा पंच दुसऱ्या स्थानावर आहे. मारुती बलेनो १७ हजार ५१७ युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, मारुती डिझायर आणि ब्रेझा अनुक्रमे १५ हजार ८३७ युनिट्स आणि १५ हजार ७६६ युनिट्ससह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिल्या आहेत.
मारुती सुझुकीने ही WagonR चार ट्रिममध्ये लाँच केली आहे ज्यात पहिला LXi (बेस मॉडेल), दुसरा VXi, तिसरा ZXi आणि चौथा व्हेरिएंट ZXi Plus समाविष्ट आहे. कंपनी तिच्या पहिल्या दोन व्हेरिएंटसह CNG किटचा पर्याय देखील देते.
मारुती वॅगनआरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्यात १ लीटर आणि १.२ लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला आहे. त्याचे १ लिटर पेट्रोल इंजिन ६७ PS पॉवर आणि ८९ Nm पीक टॉर्क जनरेट करते तर त्याचे १.२ लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन ९० PS पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. मायलेजबद्दल मारुती सुझुकीचा दावा आहे की ही कार पेट्रोलवर २४.३५ kmpl आणि CNG व्हेरिएंटवर ३४.०५ kmpl मायलेज देते.
किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या मारुती वॅगनआरची सुरुवातीची किंमत ५.५४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ७.२० लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.