Best Selling Car: देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ख्याती असलेल्या मारुती सुझुकीच्या कार भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्यांची भारतात जबरदस्त मागणी आहे. मारुती सुझुकीच्या एका कारनं गेल्या महिन्यात नव्या अवतारात लाँच होताच कार प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मारुती सुझुकीची ही कार पहिल्यांदा २००५ मध्ये सादर करण्यात आली होती. इतकी वर्षे उलटूनही या कारवरील ग्राहकाचं प्रेम काही कमी झालेलं नाही. दरवर्षी या कारची भारतात सर्वाधिक विक्री झाली आहे. आता इतकंच काय या कारला गेल्या महिन्यात कंपनीने नव्या अपडेट्सह बाजारपेठेत सादर केलं तरीही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत या मारुतीच्या कारनं अव्वल स्थानावर आपलं नाव कोरलं आहे.

मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात आपल्या प्रसिद्ध हॅचबॅक कार मारुती स्विफ्टचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल (मारुती सुझुकी स्विफ्ट 2024) लाँच केले आहे. मारुती स्विफ्टने २००५ साली भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. तेव्हापासून या कारने भारतीयांच्या मनावर कब्जा केला आहे. कंपनीने स्विफ्ट २०२४ ला नवीन अपडेट्सह आणलं आहे. स्विफ्टचे हे चौथ्या पिढीतील मॉडेलही बाजारात धमाल करत आहे. स्विफ्टच्या चौथ्या पिढीच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ६.५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत ९.६५ लाख रुपये आहे. नवीन स्विफ्टमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. इंजिनची यंत्रणा देखील बदलली आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

(हे ही वाचा: टाटाचा नाद करायचा नाय! देशात नव्या अवतारात आणतेय ‘ही’ सर्वात सुरक्षित कार; मायलेज २६ किमी अन् किंमतही कमी )

मारुतीच्या नवीन स्विफ्टने सर्वाधिक विक्री करत पहिल्या स्थानावर शिक्कामोर्तब केला आहे.तसेच विक्रीच्या बाबतीत टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे २०२४ मध्ये, नवीन मारुती सुझुकी स्विफ्टने १९,३९३ युनिट्स विकल्या आणि पंच आणि क्रेटा तसेच Dezire, WagonR, Brezza, Ertiga, Baleno आणि Forex तसेच Mahindra Scorpio यांना मागे टाकत देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली.

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर या नवीन स्विफ्टच्या नवीन डिझाईन आणि छोट्या बदलांमुळे लुक पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसतोय. समोर प्रोजेक्टर सेटअपसह शार्प दिसणारे हेडलॅम्प देण्यात आले आहेत. दोन हेडलँपमध्ये गडद क्रोम फिनिशसह हनीकॉम्ब पॅटर्नसह काळी ग्रिल प्रदान केली आहे. कंपनीचा लोगो ग्रिलच्या वर आणि बॉनेटच्या अगदी खाली दिला आहे. समोरचा बंपर देखील बदलण्यात आला आहे. १६-इंच अलॉय व्हील वगळता साइड प्रोफाइलमध्ये कोणताही बदल नाही. मागील टेललाइट्स आता पूर्वीपेक्षा लहान आणि स्पोर्टियर आहेत.

नवीन पिढीच्या स्विफ्टमध्ये काळ्या आणि पांढऱ्या ड्युअल-टोन थीमसह नवीन डॅशबोर्ड लेआउट आहे. हे फ्रँक्स, बलेनो आणि ब्रेझा यांच्यापासून प्रेरित आहे. यात ९.०-इंचाची फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये वायरलेस Apple CarPlay/Android Auto, कनेक्ट केलेले कार तंत्रज्ञान, स्टीयरिंग-माउंट केलेले नियंत्रण आणि स्वयंचलित हवामान नियंत्रण यांचा समावेश आहे.

नवीन स्विफ्टमधील सर्वात मोठा बदल पॉवरट्रेन फ्रंटमध्ये आहे. नवीन स्विफ्टमध्ये सर्व-नवीन Z-सिरीज, १.२-लिटर, तीन-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे सध्याचे K12 फोर-सिलेंडर इंजिन बदलेल. कंपनीचा दावा आहे की, नवीन स्विफ्ट MT प्रकार २४.८ kmpl आणि AMT २५.७५ kmpl चे मायलेज देते. नवीन इंजिन ८२ एचपी पॉवर आणि ११२ एनएम टॉर्क देते.

(हे ही वाचा: बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी, ३० दिवसात विकल्या ‘इतक्या’ स्कूटी )

नवीन स्विफ्टच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग्ज, ESP, हिल होल्ड कंट्रोल आणि थ्री-पॉइंट सीटबेल्ट मानक आहेत. नवीन स्विफ्ट नऊ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – सिझलिंग रेड, पर्ल आर्क्टिक व्हाइट, मॅग्मा ग्रे आणि शानदार सिल्व्हर. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – LXi, VXi, ZXi, ZXi Plus आणि ZXI Plus DT नवीन स्विफ्ट जुन्या मॉडेलपेक्षा १५ मिमी लांब आणि ३० मिमी उंच आहे. व्हीलबेस फक्त २,४५० मिमी आहे.