Best Selling Cars: गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२३ मध्ये मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे, मारुती सुझुकीने वॅगनआरच्या २०,८७९ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याशी तुलना केल्यास, त्याच्या विक्रीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे कारण एप्रिल २०२२ मध्ये केवळ १७,७६६ वॅगनआरची विक्री झाली होती. मारुती सुझुकी वॅगनआरची सुरुवातीची किंमत ५.५४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. हे ३४.०५ किमी/किलो (CNG) पर्यंत मायलेज देते.
Maruti Suzuki Swift
गेल्या महिन्यात मारुती स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली असून, एकूण १८,५७३ युनिट्सची विक्री झाली आहे. तर तिसर्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री होणारी मारुती सुझुकी बलेनो ही कार १६,१८० युनिट्स विकली गेली आहे. त्यापाठोपाठ टाटा नेक्सॉन चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप-3 गाड्या मारुतीच्या आहेत.
(हे ही वाचा: मारुतीच्या ‘या’ सीएनजी कारसमोर सर्व पडल्या फेल, खरेदीसाठी लाखो ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी, मायलेज ३५ किमी, किमतीही कमी)
सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत टाटा नेक्सॉन चौथ्या क्रमांकावर आहे, गेल्या महिन्यात १५,००२ कार विकल्या गेल्या आहेत. तर, Hyundai Creta १४,१८६ युनिट्स विकून पाचव्या क्रमांकावर होती. विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीची कार पुन्हा सहाव्या क्रमांकावर आली आहे, कंपनीच्या ब्रेझाच्या ११,८३६ युनिट्सची विक्री झाली आहे.
त्यानंतर सातव्या क्रमांकावर मारुती सुझुकी अल्टो असून ११,५४८ युनिट्सची विक्री झाली आहे. टाटा पंच १०,९३४ युनिट्स विकून आठव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मारुती सुझुकी Eeco ही १०,५०४ युनिट्सची विक्री असलेली नववी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. दहाव्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री होणारी कार Hyundai Venue होती, जी १०,३४२ लोकांनी खरेदी केली होती.