Best Selling Compact SUV: मारुती सुझुकीच्या वॅगनआरने जानेवारी २०२४ मध्ये पुन्हा एकदा सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे स्थान पटकावले. डिसेंबर २०२३ मध्ये, टाटाची नेक्सॉन कॉम्पॅक्ट SUV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार होती. पण यावेळी टाटा नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. जर आपण टॉप-१० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारबद्दल बोललो, तर या यादीत, वॅगनआर १६ हजार ५६७ युनिट्सच्या विक्रीसह अव्वलस्थानी, तर डिझायर १५ हजार ९६५ युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.
मारुती स्विफ्टने १५ हजार ३११ युनिट्सच्या विक्रीसह तिसरे स्थान पटकावले, तर टाटा नेक्सॉनने १४ हजार ९१६ युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या स्थानावर राहिली. टाटा पंचने जानेवारीमध्येही चांगली कामगिरी केली आणि १४ हजार ३८३ युनिट्सची विक्री गाठून पाचव्या स्थानावर राहिली. मारुती ब्रेझाच्या एकूण १३ हजार ३९३ युनिट्सची विक्री झाली आणि यासह या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने विक्रीच्या यादीत सहावे स्थान मिळवले.
क्रेटा आणि स्कॉर्पिओ मागे पडले
एकेकाळी विक्रीत अव्वल स्थानावर असलेली मारुती बलेनो जानेवारी २०२४ मध्ये १२ हजार ९६१ लोकांनी खरेदी केली. बलेनोने डिसेंबर २०२३ मध्ये १० हजार ६६९ युनिट्स विकल्या. तर, एर्टिगा ७-सीटर १२ हजार ८५७ ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली. जर आपण क्रेटाबद्दल बोललो, तर ती ११ हजार ८१४ युनिट्सच्या विक्रीसह टॉप-१० कारच्या विक्री यादीत शेवटच्या स्थानावर आहे. स्कॉर्पिओची विक्री डिसेंबरमधील ११ हजार ३५५ पेक्षा किरकोळ चांगली होती.
(हे ही वाचा : फास्टॅग कसा बंद करतात? त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रक्रिया)
टाटा नेक्सॉन नंबर-१
Tata Nexon गेल्या काही महिन्यांपासून विक्रीच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. डिसेंबर २०२३ मध्ये १५ हजार २८४ युनिट्सची आणि जानेवारी २०२४ मध्ये १४ हजार ९१६ युनिट्सची विक्री झाल्याने नेक्सॉने बाजारपेठेत आपली पकड मजबूत केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या टाटा नेक्सॉनच्या नवीन मॉडेलला लोकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.
टाटा नेक्सॉन इंजिन
Tata Nexon मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यात पहिले १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे १२० bhp पॉवर आणि १७० Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे म्हणजे १.५-लिटर डिझेल इंजिन जे ११५ bhp पॉवर आणि २६० Nm टॉर्क आउटपुट देते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड एएमटी आणि नवीन ७-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) समाविष्ट आहे. डिझेल युनिटसोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड एएमटीचा पर्याय देण्यात आला आहे.
टाटा नेक्सॉनची किंमत
Tata Nexon फेसलिफ्टची किंमत ८.१० लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. त्याच वेळी, टॉप व्हेरिएंटची किंमत १५.५० लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.