Best Selling Mahindra SUV: महिंद्राच्या एसयूव्ही कारना बाजारात मोठी मागणी आहे. सध्या ही देशातील चौथ्या क्रमांकाची कार विकणारी कंपनी आहे. कंपनीची महिंद्रा स्कॉर्पिओ बरीच लोकप्रिय आहे. तथापि, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महिंद्रा स्कॉर्पिओ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार नाही. खरं तर, महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बोलेरो आहे. मार्च २०२३ मध्ये, महिंद्रा बोलेरोने कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV मध्ये पहिले स्थान मिळवले आहे. याआधीही अनेक वेळा बोलेरो स्कॉर्पिओपेक्षा जास्त विकली गेली आहे.

महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी कार

गेल्या मार्च महिन्यात, महिंद्रा बोलेरोने एकूण ९,५४६ युनिट्सची विक्री केली आहे आणि यामध्ये महिंद्रा बोलेरो निओच्या विक्रीच्या आकडेवारीचाही समावेश आहे. त्याचवेळी, महिंद्रा स्कॉर्पिओच्या एकूण ८,७८८ युनिट्सची विक्री झाली आहे आणि यामध्ये स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक या दोन्हींच्या विक्रीच्या आकडेवारीचा समावेश आहे. स्कॉर्पिओ आणि बोलेरोच्या किमतीत अनेक लाखांचा फरक आहे. महिंद्रा बोलेरोची किंमत ९.७८ लाख रुपयांपासून सुरू होते. स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत १२ लाखांपेक्षा जास्त आहे.

Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स

(हे ही वाचा : Maruti ने नव्या अवतारात दाखल केला देशातील सर्वात स्वस्त मिनी ट्रक, Petrol अन् CNG दोन्ही पर्याय, किंमत फक्त ५.३० लाख )

कंपनीच्या उर्वरित गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा XUV300 तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्च महिन्यात ५,१२८ युनिट्सची विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे XUV 700 चौथ्या क्रमांकावर आणि महिंद्र थार पाचव्या स्थानावर आहे. या दोन्ही कारच्या अनुक्रमे ५,१०७ युनिट्स आणि ५,००८ युनिट्सची विक्री झाली आहे.

महिंद्राच्या टॉप-5 बेस्ट सेलिंग एसयूव्ही (मार्च २०२३)

  • महिंद्रा बोलेरो: ९,५४६ युनिट्स विकल्या
  • महिंद्रा स्कॉर्पिओ: ८,७८८ युनिट्स विकल्या
  • महिंद्रा XUV300: ५,१२८ युनिट्स विकल्या
  • महिंद्रा XUV700: ५,१०७ युनिट्स विकल्या
  • महिंद्रा थार: ५,००८ युनिट्स विकल्या

महिंद्राची विक्री वाढली

मार्च महिन्यात महिंद्राच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर, मार्च महिन्यात महिंद्राच्या एकूण विक्रीत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२३ मध्ये ते ६६,०९१ युनिट्सवर पोहोचले तर मार्च २०२२ मध्ये कंपनीने डीलर्सना ५४,६४३ युनिट्सचा पुरवठा केला. कंपनीने सांगितले की, मार्च महिन्यात युटिलिटी वाहनांची घाऊक विक्री ३१ टक्क्यांनी वाढून ३५,९७६ युनिट्सवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी (मार्च २०२२) याच कालावधीत ते २७,३८० युनिट होते.

Story img Loader