सध्या ऑटो क्षेत्रात स्कूटर्सची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांची मागणी पाहता वाहन उत्पादक कंपन्या देखील खास अपडेटेड फीचर्स असलेल्या स्कूटर्स सातत्याने बाजारात लाँच करत आहेत. यात भारतातील आघाडीची टू-व्हिलर ऑटोमोबाईल कंपनी TVS सुध्दा मागे राहिलेली नाही. TVS देशातील बाजारात नवनवीन स्कूटर्स देशात दाखल करत असते. आणि या स्कूटरला ग्राहकांची मोठी मागणी पाहायला मिळते. या स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. आता देशातील बाजारात TVS च्या एका स्कूटरचा बोलबोला पाहायला मिळाला आहे.

भारत ही दुचाकी वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सामान्य माणसाच्या बजेटमध्ये बाईक किंवा स्कूटर सहज येते, म्हणूनच त्यांची सर्वाधिक विक्री होते. याशिवाय दुचाकींचे मायलेजही चांगले असते, त्यामुळे ते चालवणे आणि देखभाल करणे कमी खर्चिक असते.  काही वर्षांपूर्वीपर्यंत स्कूटर ही केवळ कौटुंबिक वर्गाचीच पसंती असायची, मात्र आता स्कूटरला तरुणाईचीही पसंती मिळत आहे. दुचाकी कंपन्या डिझाईन आणि फीचर्सवर भर देत आहेत. त्यामुळेच दर महिन्याला स्कूटरच्या विक्रीत वाढ होत आहे. TVS मोटरच्या ज्युपिटरला भारतात खूप पसंती मिळत आहे. कंपनीसाठी ही लकी स्कूटर ठरली आहे. तसेच Honda Activa नंतर ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. या स्कूटरने Yamaha, Bajaj च्या स्कूटर्सला मागे टाकलं आहे.

New TVS Jupiter
बाकी कंपन्यांची उडाली झोप! TVS ची ‘ही’ स्कूटर नव्या अवतारात होणार देशात दाखल, किती असणार किंमत?
Hero Xoom Combat Edition
आता Activa, Jupiter टिकणार नाय? हिरोची सर्वात महागडी स्कूटर देशात दाखल, किंमत…
Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Bajaj Chetak 2901 edition launch
बाजारपेठेत उडाली खळबळ; Bajaj ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल, १२३ किमीची ड्रायव्हिंग रेंज, किंमत…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Best Selling Electric Scooter in May 2024
बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी, ३० दिवसात विकल्या ‘इतक्या’ स्कूटी

(हे ही वाचा : देशातील सर्वात लहान अन् स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली महाग; एकदा चार्ज केल्यानंतर धावणार २३० किमी, आता किती पैसे मोजावे लागणार?)

TVS ची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर

TVS ज्युपिटरने गेल्या महिन्यात ७५,८३८ स्कूटर्सची विक्री केली, तर या वर्षी एप्रिलमध्ये या स्कूटर्सच्या ७७,०८६ स्कूटर्सची विक्री झाली. तर गेल्या वर्षी मे महिन्यात ज्युपिटरच्या ५७,६९८ स्कूटर्सची विक्री झाली होती. ज्युपिटर ११०cc आणि १२५cc इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

TVS ज्युपिटर १२५: इंजिन आणि वैशिष्ट्ये

टीव्हीएस ज्युपिटर तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि होंडा अॅक्टिव्हा नंतर ही देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. १२५cc स्कूटर सेगमेंटमधील ही सर्वोत्तम दिसणारी स्कूटर आहे. ज्युपिटर 125 सेगमेंटमध्ये सर्वात मोठी बूट स्पेस आहे. यामध्ये, कंपनीने 33 लीटरचा अंडर सीट बूट स्पेस दिलाय. ज्यामध्ये दोन फूल साइज हेल्मेट सहज बसतात. कामगिरीसाठी, यात १२४.८cc इंजिन आहे, जे ८.३PS पॉवर आणि १०.५Nm टॉर्क जनरेट करते. उत्तम ब्रेकिंगसाठी यात डिस्क आणि ड्रम ब्रेकची सुविधा आहे. या स्कूटरची किंमत ८६,४०५ रुपयांपासून सुरू होते.

डिझाईनबद्दल बोललो तर ज्युपिटरमध्ये फूल एलईडी हेडलँप, हेडलाइट आणि फ्रंट एप्रनमध्ये क्रोम ट्रिटमेंट मिळते. क्रोममुळे ही स्कूटर खूपच प्रीमियम दिसते. डिस्क व्हेरियंटमध्ये समोर २२० मिमी डिस्क आहे. स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क रियरमध्ये गॅस चार्ज केलेले मोनोशॉक सस्पेन्शन बसवण्यात आलेय.