Top Selling Scooters in March:  मार्च २०२३ मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या दुचाकी ब्रँड्सबद्दल बोलायचे तर, Hero, TVS आणि Honda अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पण, जर आपण सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरबद्दल बोललो तर ती Honda Activa आहे. मार्च २०२३ मध्ये, Honda Activa ची स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री झाली. ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. Honda Activa च्या एकूण १,७४,५०३ युनिट्सची विक्री झाली आहे. त्याचवेळी, ५३,८९१ युनिट्सची विक्री करून टीव्हीएस ज्युपिटर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर ४०,१९४ युनिट्सची विक्री करून सुझुकी अॅक्सेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

होंडा विक्री

अ‍ॅक्टिव्हा गेल्या काही वर्षांपासून होंडा मोटर कंपनीसाठी प्रचंड व्हॉल्यूम निर्माण करत आहे. मार्च २०२३ यासाठी काही वेगळा ठरला नाही. तथापि, मार्च २०२३ मध्ये होंडाने एकूण १,९७,५१२ युनिट्सची विक्री केली तर मार्च २०२२ मध्ये ३,०९,५४९ युनिट्सची विक्री झाली. वार्षिक आधारावर, त्याची विक्री ३६.२ टक्क्यांनी घसरली आहे. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावरही त्याची विक्री १३ टक्क्यांनी घटली आहे. मार्चपूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये २,२७,०६४ युनिट्सची विक्री झाली होती.

(हे ही वाचा : मारुतीचा मोठा धक्का! स्विफ्ट ते वॅगनआर पर्यंत ‘या’ ६ कारच्या वाढवल्या किमती, ‘ही’ लोकप्रिय कार झाली सर्वात महाग )

सर्वाधिक विक्री होणारी होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर

Honda Activa स्कूटरची किंमत सुमारे ७५ हजार रुपयांपासून सुरू होते, जी ८८ हजार रुपयांपर्यंत जाते. ACTIVA 125 H-SMART हा सर्वात महाग प्रकार आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) ने आपली नवीन स्मार्ट अ‍ॅक्टिव्हा (Activa) भारतात लाँच केली आहे. यामध्ये तुम्हाला असे अनेक फीचर्स मिळतात, जे सहसा कारमध्ये येतात. यामध्ये चोरीपासून बचाव करणारा अलार्म असणार आहे. तसेच ही अ‍ॅक्टिव्हा चावीशिवाय सुरू आणि बंद करता येणार आहे. अ‍ॅक्टिव्हाची अनेक वैशिष्ट्ये स्मार्ट की ने ऑपरेट करता येतील.