Best Selling SUV: Hyundai ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. Hyundai गेल्या अनेक दिवसांपासून SUV सेगमेंटवर राज्य करत आहे. मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटचा विचार केल्यास, क्रेटाने गेल्या महिन्यात अव्वल स्थान पटकावले आहे. क्रेटा ही या विभागातील एकमेव एसयूव्ही आहे जिने १४ हजारांहून अधिक युनिट्स विकल्या आहेत. विक्रीच्या बाबतीत, क्रेटाने केवळ स्कॉर्पिओच नाही तर ग्रँड विटारा आणि किया सेल्टोसलाही मागे सोडले. इतर मॉडेल्सची विक्री १० हजार युनिट्सच्या खाली राहिली. या विभागात स्कॉर्पिओ क्रमांक-२ आणि किया सेल्टोस क्रमांक-४ वर आहे. ग्रँड विटारा नंबर-३ वर राहिली आहे.
एप्रिल २०२३ विक्रीत कोणत्या कारनं कारला बाजी
Hyundai Creta ने एप्रिल २०२३ मध्ये १४,१८६ युनिट्स विकल्या आहेत. याच्या एक महिना आधी म्हणजेच मार्च २०२३ मध्ये १४,०२६ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच क्रेटाच्या विक्रीत १.१४ टक्के वाढ झाली आहे. या SUV ची किंमत १०.८७ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १९.२० लाख रुपयांपर्यंत जाते.
या यादीत महिंद्रा स्कॉर्पिओ दुसऱ्या क्रमांकावर असून गेल्या महिन्यात ९६१७ युनिट्सची विक्री झाली आहे. तर महिनाभरापूर्वी ८७८८ युनिटची विक्री झाली होती. स्कॉर्पिओच्या विक्रीत मासिक ९.४ टक्के वाढ झाली आहे. यादीत मारुती ग्रँड विटारा तिसऱ्या क्रमांकावर आणि किया सेल्टोस चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही कारची अनुक्रमे ७७४२ युनिट्स आणि ७२१३ युनिट्सची विक्री झाली.
(हे ही वाचा: देशात दाखल झाली ८ गिअर असलेली ‘सुपरफास्ट’ Sporty SUV कार, ४.९ सेंकदात १००KM स्पीड, ५ लाख देऊन होईल तुमची )
Hyundai Creta ची वैशिष्ट्ये
Hyundai Creta ची किंमत १०.८७ लाख रुपये ते १९.२० लाख रुपये, एक्स-शोरूम दिल्ली आहे. यामध्ये १.५L पेट्रोल (११५PS आणि ११४Nm) आणि १.५L डिझेल (११५PS आणि २५०Nm) असे दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, यात १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि हवेशीर फ्रंट सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.