Maruti Suzuki Sub-compact SUV: सर्वांनाच माहीत आहे की, मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून दरवर्षी सर्वाधिक गाड्यांची विक्री करते. जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा बहुतेक लोक कमी बजेटमध्ये चांगलं मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात आणि यात मारुती सुझुकीच्या कार कधीच मागे पडल्या नाहीत. परवडणारी किंमत, मायलेज, फीचर्स, लुक डिझाईन यामुळे मारुती सुझुकीच्या कार्सना भारतीय बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते. नेहमीप्रमाणेच जून २०२४ च्या वाहनांच्या विक्रीवर नजर टाकली तर मारुती सुझुकीच्याच कारचा बाजारपेठेत डंका वाजला आहे.

आजकाल भारतीय कार बाजारात सीएनजी इंजिन पॉवरट्रेनमधील एसयूव्ही वाहनांची क्रेझ आहे. ही वाहने मजबूत लूक, कमी धावण्याचा खर्च आणि प्रगत वैशिष्ट्यांसह उच्च मायलेज देतात. अशीच एक मारुतीची कार बाजारात आहे. जून २०२४ मध्ये या कारच्या एकूण १३ हजार १७२ गाड्यांची विक्री झाली आहे. दर महिन्याला या कारची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते.

(हे ही वाचा: बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले! BMW चा देशातील बाजारपेठेत मोठा धमाका; ‘या’ नव्या कारसह इलेक्ट्रिक स्कूटर केली दाखल, पाहा किंमत )

भारतीय वाहन बाजारात एसयूव्हींना मोठी मागणी आहे. अशाच एका मारुती सुझुकीच्या कारला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत, ही कार मारुती सुझुकी ब्रेझा आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी इंजिन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. कारचे CNG इंजिन २५.५१ kmpl पर्यंत मायलेज देते. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन आहेत. कारला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. ही कार इलेक्ट्रिक सनरूफसह येते, ज्यामुळे ती लक्झरी कारसारखी दिसते. कारमध्ये ऑटो हेडलॅम्प आणि मागील सीटवर चाइल्ड अँकरेज आहे.

मारुती ब्रेझा वैशिष्ट्ये

ही कार वायरलेस आणि यूएसबी चार्जिंग पर्यायांसह येते, ज्यामुळे ही कार उच्च श्रेणीचा ड्राइव्ह अनुभव देते. कारमध्ये हेड अप डिस्प्ले आणि ३६० डिग्री कॅमेरा आहे, ज्यामुळे कार चालवणे सोपे होते. ही कार ॲडजस्टेबल फ्रंट सीट आणि सीट बेल्ट रिमाइंडरसह दिली जात आहे. कारमध्ये ऑटो डे/नाईट रिअर व्ह्यू मिरर देण्यात आले आहेत. या कारमध्ये टचस्क्रीन वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
कारमध्ये इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटण, मागील सीटवर एसी व्हेंट आणि सभोवतालच्या अंतर्गत दिवे यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. कारचे बेस मॉडेल ८.३४ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. कारचे CNG व्हर्जन १०.६४ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये दिले जात आहे.