Best Selling SUV Car: गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत SUV कारची विक्री सातत्याने वाढत आहे. तसेच या सेगमेंटमध्ये अनेक विभाग आणि नवीन मॉडेल्स आल्याने स्पर्धा आणखी वाढली आहे. अवघ्या अडीच वर्षांत टाटा पंचने भारतीय बाजारपेठेत स्वत:चे मजबूत स्थान निर्माण केले आहे. टाटा पंच फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई क्रेटा यांसारख्या एसयूव्ही, ज्या आधीच बाजारात आहेत आणि त्यांचा दबदबा आहे, त्याही गेल्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत मागे पडल्या आहेत. एकूण १८,४३८ युनिट्सच्या विक्रीसह टाटा पंच ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली.

यानंतर, ब्रेझा दुसऱ्या स्थानावर (SUV विक्रीमध्ये) होते, ज्याची एकूण विक्री १५,७६५ युनिट्स होती. त्यानंतर, Hyundai Creta १५,२७६ युनिट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे आणि Mahindra Scorpio N+ Classic १५,०५१ युनिट्ससह चौथ्या स्थानावर आहे. या सर्वांनंतर, टाटा नेक्सॉन पाचव्या स्थानावर आहे, फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याची एकूण १४,३९५ युनिट्स विकली गेली.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
Mumbai transport department Japan policy
वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे धोरण राबविणार
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Hyundai ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV चा आणला नवा व्हेरिएंट, किंमत…)

टाटा पंचमध्ये काय आहे खास?

टाटा पंच ही एक मायक्रो एसयूव्ही आहे आणि तिने भारतात मायक्रो एसयूव्ही सेगमेंट लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटा मोटर्सने ऑक्टोबर २०२१ मध्ये पहिल्यांदा पंच लाँच केले. लाँच झाल्यापासून, पंचने झपाट्याने बाजारपेठत स्थान मिळविले आहे आणि आता सर्वाधिक विक्री होणारी SUV आहे.

टाटा पंच ही ५ सीटर मायक्रो एसयूव्ही आहे ज्याची किंमत ६ लाख ते ९.४७ लाख रुपये आहे. त्याचे १.२-लिटर पेट्रोल इंजिन ८६PS आणि ११३ Nm जनरेट करते तर CNG वर आउटपुट कमी होते. CNG वर ते ७७ PS आणि ९७ Nm जनरेट करते. पंचसह ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

टाटा पंच सीएनजी २६.९९ किमी/किलो पर्यंत मायलेज देऊ शकते तर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकार २०.०९ kmpl पर्यंत मायलेज देऊ शकतात आणि पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रकार १८.८ kmpl पर्यंत मायलेज देऊ शकतात. कारमध्ये ७.० इंच टचस्क्रीन सिस्टीम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि वायपर्स, ऑटो एसी आणि क्रूझ कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये आहेत.

Story img Loader