Best Selling SUV in April 2024: एप्रिल २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांची यादी समोर आली आहे. टॉप १० कारच्या यादीत मारुतीची सर्वाधिक वाहने असली तरी एक अशी कार आहे ज्याने गेल्या दोन महिन्यांपासून मारुती आणि ह्युंदाईसारख्या मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे. ही SUV इतक्या वेगाने विकली जात आहे की एंट्री लेव्हलच्या गाड्याही मागे राहिल्या आहेत. गेल्या एप्रिलमधील विक्रीतही या कारने प्रथम क्रमांक पटकावला असून मारुती आणि ह्युंदाईच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांना मागे टाकले आहे.
एप्रिल २०२४ मध्ये ‘या’ कारची सर्वाधिक विक्री
जर आपण एप्रिल २०२४ च्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारबद्दल बोललो तर या यादीत पहिले नाव टाटाच्या मायक्रो एसयूव्ही पंचचे आहे. गेल्या महिन्यात, कार ग्राहकांना खूप आवडली आणि ही SUV १९,१५८ युनिट्सच्या एकूण विक्रीसह प्रथम क्रमांकावर आली. या वर्षी मार्चमध्ये पंचच्या १७,५४७ युनिट्सची विक्री झाली होती. पंचच्या विक्रीत वाढ झाल्याने ही कार ग्राहकांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
(हे ही वाचा : ऐकलं का…महिंद्राची नवी कोरी सुरक्षित SUV कार १.५ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI?)
पंचने मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार वॅगन आर लाही मागे टाकले आहे. एवढेच नाही तर Hyundai ची सर्वात स्वस्त कार i10 Nios देखील पंचापेक्षा खूप मागे पडली. गेल्या महिन्यात वॅगन आर १७,८५० युनिटसह दुसऱ्या क्रमांकावर होती. तर ब्रेझा १७,११३ युनिट्सच्या विक्रीसह तिसरे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. जवळपास सर्व एंट्री लेव्हल कार टॉप-१० कारच्या यादीतून बाहेर पडल्या आहेत. Maruti Alto K10 ने ९,०४३ युनिट्सची विक्री केली आहे, जी मार्चच्या तुलनेत थोडी कमी आहे. तर Hyundai i10 आणि Renault Kwid सारख्या गाड्या फार कमी विकल्या गेल्या आहेत.
क्रेटा-स्कॉर्पिओची विक्री किती?
Hyundai Creta च्या एकूण १५,४४७ युनिट्सची विक्री झाली आहे जी मार्चमध्ये विकल्या गेलेल्या १६,४५८ युनिट्सपेक्षा कमी आहे. स्कॉर्पिओच्या विक्रीतही घट झाली आहे. स्कॉर्पिओने मार्चमध्ये १५,१५१ मोटारींची विक्री केली. मारुतीच्या सात सीटर एर्टिगाने १३,५४४ युनिट्स विकल्या आहेत.
सध्या मायक्रो SUV सेगमेंटमध्ये टाटा कारचे वर्चस्व आहे. लोकांना ही कार इतकी आवडलीये की, मारुतीच्या गाड्यांचा मायलेजही लोक विसरलेय. Tata Punch बद्दल बोलायचे झाल्यास कंपनी पेट्रोलसह CNG मॉडेल मध्ये विकतेय. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ५-स्टार GNCAP रेटिंग जे त्याची उत्कृष्ट ताकद आणि क्वालिटी सिद्ध करते. या ५-सीटर मिनी SUV ची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.५२ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.