TVS Best Selling Bike: भारतीय ऑटो मार्केटमध्ये नेहमीच हाय मायलेज बाईक्सची मागणी असते. TVS हे भारतातील गाजलेले नाव आहे. भारतातील आघाडीची टू-व्हिलर ऑटोमोबाईल कंपनी TVS मोटर भारतीय बाजारपेठेत दुचाकींच्या विस्तृत श्रेणीची विक्री करते. ज्यामध्ये बाईक आणि स्कूटरचा समावेश आहे. या कंपनीच्या वाहनांना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनी देत असलेल्या भन्नाट फिचर्समुळे या गाड्यांची विक्री जास्त होते. भारतीय दुचाकी बाजारात कमी किमतीच्या आणि जास्त मायलेज असलेल्या वाहनांना जास्त मागणी आहे. या मालिकेत टीव्हीएसकडे एक बाईक आहे. ज्या बाईकला ग्राहकांची चांगलीच मागणी दिसत आहे.

भारतात स्वस्तात मस्त अशा बाईकना लोक अधिक पसंती देतात. येथे लोक कमी खर्चात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक खरेदी करतात.टीवीएसच्या बाईक्सना देशातील बाजारात खूप पसंती मिळत आहे. कंपनीने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून २०२४ पर्यंत एकूण १२२७१५ गाड्यांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी याच कालावधीत १०५२६१ वाहनांची विक्री झाली होती.

pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
SHIVA
Video : “तू कुठल्या अधिकाराने…”, शिवा-आशूमध्ये होणार पुन्हा भांडण; सिताई देणार नातं संपवण्याचा सल्ला, पाहा प्रोमो….

टीव्हीएसकडे स्मार्ट मोपेड XL100 आहे. या मोपेडला ग्राहकांची चांगली मागणी आहे. एप्रिल-जून २०२४ SIAM घाऊक विक्री डेटानुसार, TVS या दुचाकीची १ लाखांहून अधिक वाहनांची विक्री झाली. ही कंपनीची स्वस्त दुचाकी देखील आहे. रायडरच्या सुरक्षेसाठी कंपनीने पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला ड्युअल हायड्रॉलिक सस्पेंशन दिले आहे. TVS XL 100 मध्ये उच्च कार्यक्षमता असलेले ९९.७ cc इंजिन आहे. या मोपेडच्या सीटची उंची ७८७ मिमी आहे, ज्यामुळे रस्त्यावर नियंत्रण करणे सोपे होते. यात वायर स्पोक व्हील्स आहेत, जे याला स्टायलिश लुक देतात.

(हे ही वाचा : किंमत ३.९९ लाख, एक लिटर पेट्रोलवर धावते २५ किमी, लहान कुटुंबासाठी एकदम परफेक्ट ठरते ‘ही’ मारुती कार )

सुरक्षेसाठी, समोर आणि मागील दोन्ही टायरमध्ये ड्रम ब्रेक

कंपनीचा दावा आहे की, ते रस्त्यावर ५३.५ kmpl पर्यंत मायलेज देते. उच्च पॉवरसाठी, ते ४.२९ bhp पॉवर आणि ६.५ Nm टॉर्क जनरेट करते. हे मोपेड ४४९९९ रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत दिले जात आहे. याचे टॉप मॉडेल ७१७९४ रुपये ऑन रोड येते. सुरक्षेसाठी, समोर आणि मागील दोन्ही टायरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. हे मोपेड १६ इंच टायर साइजसह दिले जात आहे, जे याला ट्रेंडी लुक देते.

TVS XL 100 मध्ये स्प्लिट सीट पर्याय

या नव्या पिढीतील मोपेडमध्ये तरुणांसाठी सिंगल आणि स्प्लिट सीट असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये एक मोठा एलईडी हेडलाइट देण्यात आला आहे, ज्यामुळे रात्री गाडी चालवणे सोपे होते TVS XL 100 मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील देण्यात आले आहे. यात ४ लीटरची मोठी इंधन टाकी आहे, ज्यामुळे ते लांबच्या मार्गावर नेले जाऊ शकते. यात एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे, ज्यामुळे दोन्ही टायर हाय स्पीडवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. सध्या ते दोन प्रकारात उपलब्ध आहे.

TVS XL 100 किंमत

बाजारात, ही दुचाकी बजाज CT110X शी स्पर्धा करते. TVS XL100 ची किंमत ४४,९९९ रुपये आहे. ही बाईक १ लिटर पेट्रोलवर ५३ किमी धावते असा कंपनीचा दावा आहे.

Story img Loader