Bgauss d15 electric scooter: नवीन स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीमध्ये असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अतिशय स्वस्तात आणि दमदार फीचर्स असलेली इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे. BGAUSS ने देशात ‘BG D15’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली. D15 ही प्रीमियम पण परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही दमदार स्कूटर तुम्हाला फक्त ४९९ रुपयांमध्ये बुक करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

BG D15 ‘अशी’ आहे खास

BG D15 पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे, IP 67 रेट केलेले आहे, इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीने सुसज्ज आहे. BG D15 मध्ये ३.२ kWh ली-आयन बॅटरी देण्यात आली आहे. स्पोर्ट्स मोडमध्ये ही फक्त ७ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग घेवू शकते.BG D15 इको आणि स्पोर्ट या दोन राइड मोडसह सादर करण्यात आल्या आहेत. यात १६ इंची अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. लिथियम-आयन बॅटरी ५ तास ३० मिनिटांत १०० टक्के चार्ज होऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, D15 ची ARAI मायलेज ११५ किमी आहे.

(हे ही वाचा : कार घेण्याचा विचार करताय, सिंगल चार्जमध्ये २०० किमी धावणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार, फक्त २ हजार रुपयांमध्ये बुक करा )

BG D15 फीचर्स

BG D15 नवीनतम इंटेलिजेंट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. याला स्मार्टफोनही जोडला जाऊ शकतो. BG D15 मध्ये काढता येण्याजोग्या बॅटरी, इन-बिल्ट नेव्हिगेशन, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस स्टार्ट, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट, कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट यासारख्या नवीनतम वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे.

BG D15 किंमत
ग्राहक कंपनीच्या शोरूममध्ये किंवा ऑनलाइन स्कूटर बुक करू शकतात. वेबसाइटवर बुकिंगची रक्कम फक्त ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. D15 Pro ची किंमत १,१४,९९९/- (एक्स-शोरूम) आहे.