इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनी असणाऱ्या BGAUSS कंपनीने आपल्या या सेगमेंटमधील नवीन BGAUSS C12i EX इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने या स्कूटरला आपल्या लाइनअपमध्ये आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या C12 सिरीज अंतर्गत मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. C12i MAX ला तीन महिन्यांत ६,००० ग्राहक मिळाले आहेत असा कंपनीचा दावा आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, फीचर्स आणि बॅटरी याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
स्पेसिफिकेशन्स
कंपनीने आपली BGAUSS C12i EX इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आपल्या पहिल्या मॉडेलप्रमाणेच पूर्णपणे वॉटरप्रूफ, IP67 रेटेड, २.५ kWh इलेक्ट्रिक मोटर आणि २ kW लिथियम-आयन बॅटरी पॅक दिले आहे. एक नार्मल चार्जरने चार्ज केल्यास या स्कूटरची बॅटरी ३ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये ८५ किमी धावते असा देखील दावा कंपनीने केला आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर ९९,९९९ (एक्सशोरूम) रुपये या किंमतीत लॉन्च केली आहे.याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
”BGAUSS मध्ये आम्ही भारतातील EV क्रांतीमध्ये सर्वात पुढे राहण्यासाठी उत्पादन गुणवत्ता,सुरक्षितता आणि चांगले कार्यप्रदर्शन प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या अतूट वचनबद्धतेमुळे आम्हाला या उल्लेखनीय क्षणापर्यंत पोहोचता आले आहे. १०० टक्के मेड इन इंडिया, C12i EX उच्चस्तरीय इलेक्ट्रिक स्कूटर प्रदान करणे हे आमच्यासाठी समर्पणाचे उदाहरण आहे.” असे BGAUSS चे संस्थापक आणि सीईओ हेमंत काबरा म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ” आमच्या C12i MAX ला मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत प्रभावी आहे. तसेच आमच्या ग्राहकांनी आमच्या ग्रीन आणि सस्टेनेबल मोबिलिटी सोल्युशन्सवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला आशा आहे की, आमचे नवींन उत्पादन C12i EX स्कूटरला आमच्या ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. इलेक्ट्रिक स्कूटर १९ सप्टेंबर २०२३ पासून ९९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीपासून खरेदीदारांसाठी उपलब्ध होईल.”