Bharat Mobility Global Expo 2024: इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४ आजपासून सुरू झाला आहे. हा ग्लोबल ऑटोमोटिव्ह एक्स्पो आहे. या मेगा शोमध्ये अनेक कार उत्पादक, दुचाकी उत्पादक, ईव्ही उत्पादक आणि व्यावसायिक वाहन उत्पादक सहभागी होणार आहेत. या इव्हेंटला देश विदेशातील अनेक कार कंपन्यां आपल्या गाड्या सादर करणार आहेत.  Maruti Suzuki, Mahindra, Tata Motors, Hyundai, Skoda, Mercedes-Benz आणि इतर या सारख्या २८ प्रमुख वाहन उत्पादक भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४ मध्ये त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार असल्याची माहिती आहे.

टाटा मोटर्स ‘या’ कारचे प्रदर्शन करणार

टाटा मोटर्सने त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील शेअर केली आहे जी ते येथे दाखवणार आहे. यात टाटा नेक्सॉन सीएनजी, टाटा सफारी डार्क कॉन्सेप्ट, टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट, टाटा अल्ट्रोझ रेसर कॉन्सेप्ट, टाटा पंच ईव्ही, टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क आणि टाटा हॅरियर ईव्ही कॉन्सेप्ट या आठ मॉडेल्सचे प्रदर्शन केले जाईल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

ह्युंदाई ‘या’ कारचे प्रदर्शन करणार

येथे Hyundai कंपनी IONIQ 5, New CRETA, TUCSON, VERNA सारखी मॉडेल्स आणि त्याच्या स्मार्ट सेन्स ADAS आणि हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल सारखे तंत्रज्ञान देखील प्रदशित करणार आहे.

(हे ही वाचा : टाटाच्या ‘या’ SUV कारचा देशभरात जलवा; झाली दणक्यात विक्री, ६ लाख युनिट्स प्रोडक्शनचा गाठला टप्पा)

मर्सिडीज-बेंझही कारचे प्रदर्शन करणार

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४ मध्ये, मर्सिडीज-बेंझ त्यांची नवीन संकल्पना EQG प्रदर्शित करेल, जी सर्व-इलेक्ट्रिक जी-क्लासची संकल्पना आवृत्ती आहे. यासह, GLA आणि AMG GLE 53 Coupe फेसलिफ्ट देखील प्रदर्शित केले जातील.

त्याचप्रमाणे, इतर कंपन्या देखील त्यांची अनेक उत्पादने आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करतील. यामध्ये दुचाकी कंपन्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो २०२४ आज (१ फेब्रुवारी २०२४) ते ३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालेल.

ऑटो एक्स्पो हा भारतातील सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह इव्हेंट आहे. भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे या शोचे याचे आयोजन करण्यात आले आहे. तीनही दिवस रात्री १० ते सायंकाळी ६ या वेळेत तुम्ही येथे भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो २०२४ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल.

Story img Loader